मुंबई :महाराष्ट्र रिअल इस्टेट नियमक प्राधिकरण महारेराच्यावतीने रियल इस्टेट एजंट यांच्यासाठी औपचारिक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यास सुरू करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. यामुळे एकूणच या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि अत्यंत उच्च प्रतीची गुणवत्ता येणार आहे. या अनुषंगाने हा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार आता एक मे 2023 पासून ज्यांच्याकडे हे पात्रता प्रमाणपत्र असेल त्यांनाच ग्राहकाला घर दाखवण्याचा किंवा विकासाला ग्राहकांची मध्यस्थी करण्याचा अधिकार राहणार.
ब्रोकरला औपचारिक प्रशिक्षण :रियल इस्टेट क्षेत्राकडून या संदर्भातल्या निर्णयाचे स्वागत होत आहे. तर काहींनी या संदर्भात प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहे. मुंबई हे बॉलीवूड आणि इतर व्यवसाय तसेच रिअल इस्टेटसाठी अत्यंत महत्त्वाचे असे शहर म्हणून समजले जात आहे. या ठिकाणी अत्यंत प्रचंड किमतीला घर खरेदी करण्यासाठी किंवा घर विक्री करण्यासाठी प्रत्येकाला रियल इस्टेट ब्रोकरवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच रिअल इस्टेट ब्रोकर यांच्यात औपचारिक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जावे असा विचार महारेराने केला होता. आता त्या संदर्भातला त्यांनी प्रस्ताव रियल इस्टेट एजंट असोसिएशनकडे दिलेला आहे.
अनेक जण अपात्र असतात : पूर्वी रस्त्यावरील असलेली पान टपरी, चहाचे दुकान यातील माणसे ही घरे विकणे किंवा भाड्याने देणे यासाठी एजंटगिरी करत होते. अद्यापही काहीजण रियल इस्टेट एजंट म्हणून काम करतात. मात्र त्यापैकी अनेक जण पात्र नसलेले किंवा पात्रता धारण केलेले नसतात. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीकडन घर खरेदी करण्यासाठी मध्यस्थी म्हणून संपर्क करता. आता त्यांना म्हणजे रिअल इस्टेट एजंटला या संदर्भात प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
परीक्षा उत्तीर्ण झाल्यास परवाना मिळणार : 2017 पासून महाराष्ट्र शासनाने रियल इस्टेट या क्षेत्रामध्ये रेरा कायदा लागू केला. तो कायदा लागू केल्यानंतर रियल इस्टेट एजंट म्हणून निवडलेल्या कोणालाही महाराष्ट्र रिअल इस्टेट नियमक प्राधिकरणाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी विहित कागदपत्रे पूर्तता केल्यावरच होते. परंतु अद्यापही यामध्ये नोंदणीत झालेली नाही. त्यामुळे महारेराने या संदर्भात औपचारिक अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण प्रस्ताव तयार करून दिलेला आहे. महारेराने त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या एकूण पाच वर्षांमध्ये 40872 अर्ज आले. त्या अर्जांपैकी 38 हजार 908 रियल इस्टेट एजंटना महाराष्ट्रातील नोंदणी केलेले एजंट म्हणून मान्यता दिलेली आहे. मात्र मुंबई भागातील रियल इस्टेट एजंट बनणे हे फार जिकरीचे आणि कंटाळवाणे आहे. त्याचे कारण आता त्याला परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. ते योग्य असल्याचे सिद्ध करावे लागेल आणि त्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळवावे लागेल तरच त्यांना व्यवसाय करण्याचा परवाना मिळेल.
कायदेशीर माहिती असणे गरजेचे : रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण कार्यक्रम सादर करण्याचे परिपत्रक महारेराने काढले आहे. 1 मे 2023 पासून सर्वांना नवीन नोंदणी व नूतनीकरण हे लागू होईल. त्यामुळे सर्व ब्रोकर्स ने 1 सप्टेंबर 2023 पूर्वी सक्षमतेचे प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. महारेरा संदर्भातील कायद्यामधील कलम 9 नुसार कोणत्याही व्यक्तीला जर घर खरेदी करायचे असेल किंवा प्लॉट अथवा अपार्टमेंट किंवा एखादी युनिट किंवा इमारतीची विक्री किंवा खरेदी करायची असेल तर त्यासाठी प्रत्येक रियल इस्टेट एजंटला महारेरामध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. रियल इस्टेट एजंट हा सार्वजनिक चेहरा आहे. घर खरेदीदार करणारे लोक त्यांच्याकडे त्या विश्वासाने पाहत असतात. तो विकणारा आणि घेणारा यांच्यामधील मध्यस्थी असतो. त्यामुळे त्याला या संदर्भातली अद्यावत कायदेशीर माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे होणारे नुकसान गैरसमज आणि वाद हे टाळले जातील.
हेही वाचा :CM Eknath Shinde : दावोस परिषदेतून राज्याच्या विकासासाठी चांगली गुंतवणूक आणू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही