महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BMC : मुंबईतील नाले बंदिस्त करून सोलर पॅनल बसवण्याचा विचार ; पालिकेची प्रस्तावित योजना

मुंबईमध्ये सुमारे ९०० किलोमीटर लांबीचे नाले ( Drains in Mumbai ) आहेत. या नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो. यामुळे हे नाले तुंबून परिसरात पावसाचे पाणी साचते. यावर अंकुश आणण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने ( Brihanmumbai Municipal Corporation ) नाले आच्छादित करण्याचा विचार सुरु केला आहे. त्याबाबतचे एक धोरण पालिका प्रशासन बनवत आहे. हे नाले आच्छादित केल्यावर त्यावर सोलर पॅनल ( Installing solar panels by blocking the drains ) लावून बाजूच्या नागरिकांना वीजही मिळवता येणार आहे. अशी योजना बनवली जाणार आहे.

Brihanmumbai Municipal Corporation
Brihanmumbai Municipal Corporation

By

Published : Dec 20, 2022, 8:26 PM IST

मुंबईतील नाले बंदिस्त करून सोलर पॅनल बसवण्याचा विचार

मुंबई : मुंबईमध्ये ५ नद्या वाहतात. ३०९ मोठे नाले ( Drains in Mumbai ) असून त्यांची लांबी अंदाजे २९० किलोमीटर आहे. ५०८ छोटे नाले असून त्यांची लांबी ६०० किलोमीटर इतकी आहे. रस्‍त्‍यालगत गटारे असून त्यांची लांबी सुमारे २०० किलोमीटर आहे. हे सर्व नाले विशेष करून उपनगरात आहेत. या नाल्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती आहे. या वस्त्यांमधून नाल्यात कचरा टाकला जातो. नाल्यात टाकलेला कचरा पालिकेला दरवर्षी काढावा लागतो. त्यासाठी पालिकेला दरवर्षी १०० कोटीहून अधिक निधी खर्च करावा लागतो. नाल्यांमध्ये कचरा टाकल्यामुळे नाले तुंबून परिसरात पावसाचे पाणी साचते. यावर अंकुश आणण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने ( Brihanmumbai Municipal Corporation ) नाले आच्छादित करण्याचा विचार सुरु केला आहे. हे नाले आच्छादित केल्यावर त्यावर सोलर पॅनल बसविण्याचा देखील विचार सुरू ( Installing solar panels by blocking the drains ) आहे.


नाले बंदिस्त होणार : राष्ट्रीय हरित लवादाने हरियाणामधील गुरगाव महानगरपालिकेशी सल्लामसलत करून पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई करून, त्या बंदिस्त न करता स्वच्छ परिरक्षित करण्यात याव्यात असे निर्देश दिलेले आहेत. या निवाड्याच्या प्रती संपूर्ण भारतामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण मंडळ आदींना पाठविण्याकरिता हरित लवादाने संबंधितांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबईतील मुख्य नाले सिमेंट काँक्रिटच्या स्लॅबद्वारे बंदिस्त करण्यासाठी धोरण बनवण्यासाठी एक मसुदा बनवण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या पायाभूत सुविधा विभागाकडून देण्यात आली आहे.


सौरउर्जेसाठी पॅनल बसविण्याबाबत विचार : मुंबई महापालिकेतील तत्कालीन भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी मुंबईतील नाले आच्छादित करून त्यावर सोलर एनर्जी म्हणजेच ग्रीन एनर्जी निर्माण करावी अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. याबाबत विचारले असता असे करणे स्वच्छतेच्या दृष्टीने खर्चिक आहे. सेवाभावी संस्था. गृहनिर्माण संस्था, महानगरपालिकेची विविध खाती, शासकीय इमारती, खाजगी भूधारक अथवा विविध शैक्षणिक संस्था विविध प्राधिकरणे अशा प्रकारचा स्वखर्चाचा प्रस्ताव महानगरपालिकेस प्राप्त झाल्यास नाल्यावर सौरउर्जेसाठी पॅनल बसविण्याबाबतच्या प्रस्तावच्या तांत्रिक बाबी तपासून बघितल्या जातील असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईतील नाले :
1. मोठे नाले - 309 (लांबी अंदाजे २९० किमी).
2. छोटे नाले 508 (लांबी ६०० किमी)
3. रस्‍त्‍यालगत गटारे असून त्यांची लांबी सुमारे २,०० किमी.

ABOUT THE AUTHOR

...view details