मुंबई :मुंबईतील गोरेगांव - मुलुंड लिंक रोड प्रकल्पात (Goregaon Mulund road project) १२.२ किलोमीटर लांबीच्या या मार्गात काही बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आली आहेत. यातील ५५ बांधकामावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) कारवाई केल्याने रस्त्याच्या कामाला गती येणार आहे. कारवाईदरम्यान ‘एस विभाग’ कार्यक्षेत्रातील सुदर्शन हॉटेल ते तुळशेतपाडा या सुमारे अर्धा किलोमीटर लांबीच्या भागात उद्भवलेली ५५ अनधिकृत बांधकामे (unauthorized constructions) हटविण्यात आली आहेत.
Goregaon Mulund road project : गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा ‘गोरेगांव - मुलुंड लिंक रोड’ (GMLR) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. सुमारे १२.२ किलोमीटर लांबीच्या या मार्गात काही बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आली आहेत. यातील ५५ बांधकामावर पालिकेने कारवाई केल्याने रस्त्याच्या कामाला गती येणार आहे.
५५ अनधिकृत बांधकामे तोडली : 'गोरेगांव - मुलुंड लिंक रोड’चे (Goregaon Mulund road project) काम सुरू आहे. या रस्त्यामुळे पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर येथे ये जा करणे सोपे जाणार आहे. या रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे असल्याने रस्ते कामाला उशीर होत आहे. अनधिकृत बांधकामे हटविणे प्रकल्पासाठी गरजेचे असल्याने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान ‘एस विभाग’ कार्यक्षेत्रातील सुदर्शन हॉटेल ते तुळशेतपाडा या सुमारे अर्धा किलोमीटर लांबीच्या भागात उद्भवलेली ५५ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत.
रस्त्याची रुंदी वाढली : बेकायदेशीर बांधकामामुळे येथील रस्त्याची रुंदी सुमारे ३० मीटर इतकी होती. आता बेकायदेशीर बांधकाम पालिकेने तोडल्याने ती रुंदी ४५.७५ मीटर इतकी झाली आहे. पालिकेच्या ‘एस’ विभागाद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाईनंतर मोकळ्या केलेल्या भागाचा ताबा बृहन्मुंबई महापालिकेच्या पूल विभागाकडे देण्यात आला आहे, अशी माहिती ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली आहे.