मुंबई -चुनाभट्टी येथून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स(बीकेसी)ला जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन सरकारकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी कार्यकर्त्यांसोबत या पुलाचे उद्घाटन करण्याचा इशारा दिला. मलिकांच्या या निर्णयाला एमएमआरडीए प्रशासनाने प्रतिसाद देत आठ दिवसांच्या आत पूल वाहतूकीसाठी सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
चुनाभट्टी ते बीकेसी पूल होणार सुरू? एमएमआरडीएचे आश्वासन
नवाब मलिक यांनी स्वत:च चुनाभट्टी येथून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स(बीकेसी)ला जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन करण्याचा इशारा दिला. मलिकांच्या या निर्णयाला एमएमआरडीए प्रशासनाने प्रतिसाद देत आठ दिवसांच्या आत पूल वाहतूकीसाठी सुरू करण्याचे आश्वासन दिले.
चुनाभट्टी ते बीकेसी पूल
हेही वाचा - रायगडमध्ये 'क्यार' चक्रीवादळाचा किनारपट्टीला तडाखा, ऐन दिवाळीत पर्यटनाला फटका
आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा पूल मंजूर झाला होता. गेली पाच वर्षे भाजप सरकारने या पुलाचे काम रखडवले. निवडणुकीपुर्वी पुलाचे काम पु्र्ण होवूनही तो वाहतूकीसाठी खुला केला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली. यावर उपाय म्हणून नवाब मलिक यांनी स्वत:च पुलाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला होता.