मुंबई : थर्टी फर्स्ट म्हणजेच नववर्षाच्या जल्लोषात स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असतानाच मुंबई पोलीस देखील (New Year 2023 Drink Drive) मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले ( 31 celebration in Mumbai ) आहेत. मुंबई पोलीस आणि सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरासह सागरी किनाऱ्यांवरील सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. थर्टी फर्स्ट नाईटला हॉटेल्स, बार, वाईन, शॉप रेस्टॉरंट पोलिसांच्या परवानगीने पहाटे 5 वाजेपर्यंत सशर्त सुरू ठेवण्यास राज्य सरकारने मुभा दिल्याने मुंबईकरांना मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करता येणार ( Police Deployed For Thirty First ) आहे.
तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई : अवैध दारू, ड्रग्जची तस्करी करणारऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली (Action Against Liquor Smugglers ) आहे. 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईतील रस्त्यावर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. 10 हजार पोलीस कर्मचारी, दीड हजार अधिकारी, 25 पोलीस उपायुक्त, सात अतिरिक्त आयुक्त, एसआरपीएफच्या 46 तुकडया, दंगल नियंत्रण पथकाच्या तीन आणि शीघ्र कृती दलाच्या 15 तुकडया तैनात केल्या जाणार आहेत. महिला छेडछाडीच्या घटना घडू नये म्हणून साध्या वेशात पोलीस तैनात केले जाणार आहे.
ब्रेथ एनालाईझर वापर : कोरोनामुळे अनेक निर्बंध असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करून घरात सोसायटी टेरेसवर नववर्षाचे स्वागत केले होते. मात्र, यंदा मुंबईकर मोठ्या संख्येने थर्टी फर्स्टच्या रात्री घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन वाहन चालवणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलीस कडक कारवाई करणार आहे. दोन वर्षानंतर वाहतूक पोलीस ब्रेक अनालायझर या ब्रह्मास्त्राचा वापर करणार ( Breathalyzer For Drunk And Drive case ) आहे. त्यामुळे मुंबईकरांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.