नवी दिल्ली - देशात लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. विरोधकांनी एकत्र येऊन विरोध करण्याची गरज आहे असे माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले. ते राहुल गांधी यांना भेटण्यासाठी गेले होते.
Big Breaking News : देशात लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त - संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट - अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक
![Big Breaking News : देशात लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त - संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट Breaking update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13262267-thumbnail-3x2-breaking.gif)
17:04 October 05
देशात लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त -संजय राऊत
16:08 October 05
नागपुरात विजेच्या धक्काने दोन महिलांचा मृत्यू
नागपूर - बाजार चौक येथील दुर्गा मंदिर शेजारी विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंजू पुरुषोत्तम विरुळकर आणि अलका निरंजन विरुळकर असे मृत महिलांचे नावे आहेत. दोन्ही जावा घरगुती काम करत असताना त्यांना विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने ही घटना घडली आहे.
15:48 October 05
दडपशाहीविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याची गरज - संजय राऊत
लखीमपूर खिरी हिंसाचारामुळे देश हादरला आहे, यूपी सरकारने प्रियंका गांधी यांना अटक केली आहे, विरोधी पक्षांच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यास प्रतिबंधित केले जात आहे. उत्तर प्रदेशात सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांना आज दुपारी 4.15 वाजता भेटणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
15:39 October 05
ठाण्यात तरुणाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या
ठाणे - कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान चोरीच्या उद्देशाने रेल्वे रुळावर नेऊन तरुणाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
15:25 October 05
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत यशोमती ठाकूर यांचे सहकार पॅनल विजयी
अमरावती - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलचा विजय झाला आहे.
14:17 October 05
उत्तर प्रदेश
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींना सितापूर पोलिसांकडून अटक
शांतता भंग केल्याचा, हिंसाचार भडकावल्याच्या आरोपांतर्गत गुन्हा दाखल
लखीमपूर खीरी हत्याकांडानंतर पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला जात असताना प्रियांकांना अटक
दरम्यान, या हिंसाचारात 4 शेतकऱ्यासह एकूण 8 जणांचा मृत्यू
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चडवल्याचा आरोप
आशिषने गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप
आंदोलकांवर गाडी घातल्याचा व्हिडिओही व्हायरल
14:09 October 05
एमपीएससी जाहिरात प्रसिद्ध
राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण २९० पदांवरील जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध
भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ही परीक्षा ०२ जानेवारी २०२२ रोजी
राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार परीक्षा
14:07 October 05
मुंबई फ्लॅश -
कॉर्डींया क्रुझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टी प्रकरणाची आता मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु
क्रुझमधील पार्टीसाठी परवानगी मागणारे कोणतेही लेखी पत्र पोलिसांना नाही
क्रुझ लिनरवर पार्टीसाठी कोणत्याही परवानग्या घेतल्या आहेत की नाही याबाबात, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि शिपिंग विभागाकडून विचारणा करण्यात आली आहे.
13:30 October 05
औरंगाबाद ब्रेकिंग - अतिवृष्टीच्या नुकसानभरपाई मागणीसाठी तरुण शेतकरी विषाची बाटली घेऊन उतरला पाण्यात
मराठवाड्यात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.शेतकऱ्यांना फक्त आश्वासने न देता तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी औरंगाबाद येथे तरुण तलावाच्या पाण्यात विषाची बाटली घेऊन उतरला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा दिला आहे.
12:56 October 05
मुंबई फ्लॅश -
किंग खान आणि उद्योगपतींची मुले जी रोज पंचतारांकित आणि मोठ मोठ्या हॉटेल्समध्ये जेवतात. त्यांना एनसीबी कस्टडीत असताना एनसीबीच्या कार्यालयाजवळीच्या रस्त्यावरील तसेच गाड्यावरील पुरी भाजी, पराठा आणि डाळ भात बिर्याणा देण्याती आली. दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि मोठ्या उद्योगपतींची मुलं अशी मिळून तिघेजण एनसीबीच्या कस्टडीत आहेत. त्यांना असे जेवण देण्यात आले.
12:16 October 05
पुणे -
स्वातंत्र्याची 75 वर्षे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्ताने सलग 75 तास विशेष लसीकरण मोहिमेला सुरवात
मोहिमेला अल्प प्रतिसाद
सकाळपासून 10 ते 15 जणांचेच लसीकरण
11:49 October 05
मुंबई -
मुंबई एनसीबीने आणखी दोन जणांना अटक केली
जोगेश्वरी परिसरातून एका ड्रग पेडलरला काल रात्री अटक केली
तसेच काल कॉर्डीला क्रूझवरून एनसीबीने ताब्यात घेतलेल्या 8 जणांपैकी चौकशी केल्यानंतर एनसीबीने 3 आरोपींना अटक केली
ह्या नवीन आरोपींना एनसीबी न्यायालयात हजर करणार आहे
11:47 October 05
मुंबई -
मुंबई फ्लॅश -
कॉर्डींया द क्रूझच्या सीईओला एनसीबीचे समन्स बजवाले होते.
मात्र, चौकशीला उपस्थित नसल्याने आज कॉर्डींयाच्या सीईओला दुसरे समन्स बजावले आहे.
कॉर्डींया द क्रूझवर सुरू असलेल्या पार्टीवर एनसीबीने धाड टाकून केली होती कारवाई
या कारवाईत अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनलाही एनसीबीने अटक केलीय
11:18 October 05
नाशिक -
लवकरच देशातील गाड्यांचे हॉर्न आणि सायरनचा आवाज बदलणार
तसा कायदाही येणार
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
वाहनांच्या हॉर्नमध्ये फक्त भारतीय वाद्यांचा आवाज वापरता येणार
याशिवाय रुग्णवाहिका आणि पोलीस वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सायरनचाही विचार होणार
ऑल इंडिया रेडिओवर वाजवल्या जाणाऱ्या ट्यूनमध्ये त्यांचे रूपांतर करण्याचा विचार
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
10:59 October 05
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा पहिला निकाल हाती, परिवर्तन पॅनलचे उमेदवार व राज्यमंत्री बच्चू कडू यांचा विजय
अमरावती फ्लॅश
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा पहिला निकाल हाती
परिवर्तन पॅनलचे उमेदवार व राज्यमंत्री बच्चू कडू यांचा विजय
बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा केला पराभव
बच्चू कडू यांना 22 तर बबलू देशमुख यांना मिळाली 19 मते
09:43 October 05
कोल्हापूर -
कोल्हापूर जिल्ह्यातील कापशीमध्ये नरबळीची घटना घडल्याची शक्यता
अपहरण केलेल्या 7 वर्षीय आरव केशव केशरे याचा नरबळी दिल्याचा संशय
आरवचं दोन दिवसांपूर्वी झालं होतं अपहरण
शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातील धक्कादायक घटना
आरवचा मृतदेह घरामागे हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याचं उघड
पहाटे 6 वाजता सापडला आरवचा मृतदेह
कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ
09:40 October 05
नंदुरबार -
नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात
11 जिल्हा परिषद गट व 14 गणांसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात
जिल्ह्यात ४५६ मतदान केंद्रांची व्यवस्था
२ लाख ८२ हजार ३८७ मतदार हक्क बजावणार
१ लाख ३९ हजार ५४८ महिलार मतदार
१ लाख ४२ हजार ८३९ पुरुष मतदार
जिल्ह्यात 2700 पेक्षा अधिक मतदान कर्मचारी नियुक्त
08:32 October 05
मुंबईच्या दोन मुलींवर जालन्यात समूहिक अत्याचार
-मुंबईच्या दोन मुलींवर जालन्यात समूहिक अत्याचार
-नोकरीचे आमिष दाखवून बोलवले होते जालन्यात
- दोघींवर चार जणांनी महिनाभर अत्याचार केल्याची घटना उघडकीस
-मुलींनी औरंगाबाद गाठत सिडको पोलीस ठाण्यात दिली तक्रार
-सिडको पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा केला दाखल
-जालना पोलिसांनी तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
-औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल
08:00 October 05
नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारपुरा येथे एकाची हत्या
नागपूर फ्लॅश - नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारपुरा येथे एकाची हत्या
मृतकाला परिसरात घंटी नावाने ओळखले जायचे,तो कचरा वेचण्याचे काम करत होता
आरोपी मनोज भोजने हा देखील कचरा वेचण्याचे काम करत होता
दोघांमध्ये वाद झाला असता आरोपीने घंटीच्या डोक्यावर वीट मारून त्याची हत्या केली
पोलिसांनी आरोपी मनोज भोजनेला अटक केली आहे
07:49 October 05
मुंबईच्या प्रियदर्शनी पार्क येथील समुद्रात 2 मुले बुडाली
मुंबई फ्लॅश -
मुंबईच्या प्रियदर्शनी पार्क येथील समुद्रात 2 मुले बुडाली
काल सायंकाळी 6 मुले गेली होती पोहायला
त्यापैकी 4 मुले परत आली
2 मुले परत न आल्याने शोध मोहीम सुरू
07:45 October 05
नागपूर - 16 जिल्हापरिषद, 31 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
नागपूर -
16 जिल्हापरिषद तर 31 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होत आज आहे.
नागपूर जिल्ह्यात सकाळपासून मतदान प्रक्रियेला सूरवात झाली आहे. यामध्ये शहरालगतच्या सेंट झेव्हियत मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला सुरवात केली आहे.
06:33 October 05
Breaking - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वॉड्रा यांच्या सुटकेची मागणी
काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
सीतापूर येथील पीएसी अतिथीगृहाबाहेर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वॉड्रा यांच्या सुटकेची मागणी
लखीमपूर खीरी हत्याकांडात 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू
याप्रकरणी प्रियांका गांधी या हिंसाचारातील मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी चालला होत्या लखीमपूरला
यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी केलीय प्रियांका गांधींना अटक
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्राचा मुलगा आशिषने आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचे आरोप
यात 8 जण चिरडल्याचाही आरोप