मुंबई -शहरात आज 5 दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 578 गणेश/गौरी मूर्तींचे विसर्जन झाले. एकूण 578पैकी कृत्रिम तलावात 279 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आतापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
Breaking : 5 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन, कोणतीही अनुचित घटना नाही - breaking News
17:26 September 14
पाच दिवसांच्या बाप्पाचे मुंबईत विसर्जन
13:26 September 14
नागपूरातील कोचिंग क्लासेसची साबीआयकडून तपासणी
जेईई मेन्स परीक्षेतील गैरप्रकाराचे कनेक्शन नागपूरपर्यंत आले आहे. या प्रकरणातील काही दस्तावेजांची तपासणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. नागपूरातील आजमशाह चौक व नंदनवन परिसरात दोन कोचिंग क्लासेसची सीबीआयच्या पथकाने काल (सोमवार) चौकशी केली. गेल्या आठवड्यात दिल्ली, जमशेदपूर, इंदूर, बंगळुरु आणि पुण्यात काही कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता नागपुरात तपास मोहीम राबविल्याची माहिती आहे. जेईई मेन्स परीक्षार्थिंना नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन देऊन गैरप्रकार केल्याचा संशय या कोचिंग क्लासेसबद्दल आहे.
13:14 September 14
वर्धा नदीत बोट उलटली; ११ बुडाले, 3 मृतदेह हाती
अमरावती - वर्धा नदीत बोट उलटली, ११ जण बुडाले
अमरावती जिल्ह्यातील गाळेगावं येथील धक्कादायक घटना
३ जणांचे मृतदेह हाती लागले
८ जणांचा शोध सुरू
बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल
11:59 September 14
सोमय्यांचा बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग - नवाब मलिक
मुंबई - राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्यांच्या आरोपानंतर आज (मंगळवार) राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमय्यांचा समाचार घेतला आहे. सध्या सोमय्या यांच्याकडून बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरु असल्याची टीका मलिक यांनी केली.
09:56 September 14
मुंबईत पुन्हा बलात्कार, नराधमाचे 7 वर्षांच्या मुलीसोबत दुष्कर्म
मुंबई पुन्हा बलात्काराची घटना घडली आहे. अंधेरीतील एमआयडीसी परिसरात एका 7 वर्षांच्या मुलीसोबत आरोपीने दुष्कर्म केले आहे. आरोपी अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरातीलच आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पॉस्को अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गेल्या 10 दिवसांपासून संबंधित पीडित अल्पवयीन मुलीला पैसे देऊन तिच्यासोबत दुष्कर्म करत होता. दरम्यान, यापूर्वीच साकीनाका येथील महिलेवर बलात्कारक केल्याची घटना घडली. त्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
09:49 September 14
नागपूरातील कोचिंग क्लासेसची सीबीआयकडून तपासणी
नागपूर- जेईई मेन्स परीक्षेतील गैरप्रकाराचे कनेक्शन नागपूरपर्यंत आले आहे. या प्रकरणातील काही दस्तावेजांची तपासणी सीबीआय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. नागपूरातील आजमशाह चौक व नंदनवन परिसरात दोन कोचिंग क्लासेसची सीबीआयच्या पथकाने काल (सोमवार) चौकशी केली.
गेल्या आठवड्यात दिल्ली, जमशेदपूर, इंदूर, बंगळुरु आणि पुण्यात काही कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यात आली होती, त्यानंतर आता नागपुरात तपास मोहीम राबविल्याची माहिती आहे.
जेईई मेन्स परीक्षार्थींना नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन देऊन गैरप्रकार केल्याचा संशय या कोचिंग क्लासेसबद्दल आहे..
08:29 September 14
कोल्हापूर -
पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर,
राजाराम बंधारा पाणी पातळी 31 फुटांवर, तर पंचगंगा नदी इशारा पातळी - 39 फूट व धोका पातळी - 43 फूट आहे.
21 बंधारे पाण्याखाली,
जिल्ह्यात जोरदार पाऊस,
राधानगरी धरणाचे सुद्धा 4 दरवाजे उघडले, 7 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
06:03 September 14
मोदी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्राच्या उच्च स्तरीय विभागाच्या सामान्य चर्चेला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) 76 व्या सत्राच्या उच्च स्तरीय विभागाच्या सामान्य चर्चेला संबोधित करणार आहेत. याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.