मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सध्या कोरोना विषाणू वेगाने पसरतोय. त्यातच शहरातील काही ठिकाणे या कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. तशाच प्रकारे हॉटस्पॉट ठरलेल्या वड्याळ्यातील बीपीटी रुग्णालय आता सील करण्यात आले आहे.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट..! अखेर वडाळ्यातील कोरोना हॉटस्पॉट झालेले बीपीटी रुग्णालय सील - mumbai bpt hospital
रुग्णालयात आतापर्यंत कोरोनाचे दोन रुग्ण दगावले होते. एका नर्सलाही कोरोनाची लागण झाली होती. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे हे रुग्णालयच एक प्रकारे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले होते. यामुळे हे रुग्णालय सील व्हावे, अशी मागणी ई टीव्ही भारतने लावून धरली होती. याची दखल घेत अखेर हे रुग्णालय सील करण्यात आले आहे.
![ईटीव्ही भारत इम्पॅक्ट..! अखेर वडाळ्यातील कोरोना हॉटस्पॉट झालेले बीपीटी रुग्णालय सील BPT hospitals wadala in Mumbai have been sealed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6806873-312-6806873-1586961931971.jpg)
बीपीटी रुग्णालयात कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक त्या सुविधा नसतानाही कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत होते. रुग्णालयात आतापर्यंत कोरोनाचे दोन रुग्ण दगावले होते. एका नर्सलाही कोरोनाची लागण झाली होती. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे हे रुग्णालयच एक प्रकारे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले होते. यामुळे हे रुग्णालय सील व्हावे, अशी मागणी ई टीव्ही भारतने लावून धरली होती. याची दखल घेत अखेर हे रुग्णालय सील करण्यात आले आहे.
बीपीटीच्या रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाची कोणतीही सुरक्षा घेतली जात नव्हती. कर्मचारी मानसिक दबावाखाली होते. रुग्णालय प्रशासनाने हे सगळे आरोप फेटाळत सर्व काही व्यवस्थितपणे हाताळले जात आहे, काही कर्मचारी मुद्दामहून करत आहेत, असे म्हटले होते. ईटीव्ही भारतने हे प्रकरण सतत लावून धरले होते. खासदार राहुल शेवाळे, स्थानिक नेते मनोज संसारे हे देखील या कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. अखेर आज रुग्णालय प्रशासन नरमले आणि रुग्णालय सील करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी ईटीव्ही भारतचे आभार मानले आहेत.