महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime News: प्रियकराने प्रेयसीच्या पतीचा खून करून पुरला मृतदेह, पोलिसांनी शिताफीने आरोपीला केली अटक - killed girlfriend husband

मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. पत्नीच्या प्रियकराने तिच्या पती आणि त्याच्या जिवलग मित्राची हत्या केली. पोलिसांनी मृतदेह मुंबईला लागून असलेल्या काशिमीरा जंगलात नेऊन पुरला असल्याची उकल केली आहे.

Murder of lover husband
प्रेयसीच्या नवऱ्याची हत्या

By

Published : Jun 8, 2023, 11:00 AM IST

मुंबई :पत्नीशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून मित्रांचा वाद झाला. या किरकोळ भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत 38 वर्षीय व्यक्तीने त्याच्याच मित्राचा लोखंडी हातोडा मारून खून केला. दिनेश प्रजापति (वय 38) असे मृत तरुणाचे नाव असून सुरेश कुमावत (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने मृताच्या मोबाईलवरून आपण आत्महत्या करत असल्याचा एक मेसेज मृताच्या पत्नीला पाठवला होता.

प्रेयसीच्या नवऱ्याची हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिलेने आपला पती मिसिंग झाल्याबाबतची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता पोलिसांना वेगळाच संशय आला. या प्रकरणात मिसिंग झालेल्या व्यक्तीचे काहीतरी बरे वाईट झाल्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान माहितीदाराकडून आरोपी सुरेश कुमार कुमावत याच्याविषयी माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला बोलावून चौकशीला सुरुवात केली, मात्र त्याने चौकशी दरम्यान पोलिसांना गुंगारा देण्याचाही प्रयत्न केला. शेवटी त्याने दिनेश प्रजापति याची हत्या आपणच केल्याचे कबूल केले.

हत्या केल्याची कबुली :आपल्या पत्नीसोबत सुरेश कुमावत याचे प्रेम संबंध असल्याचा संशय होता. यावरून अनेकदा सुरेश आणि दिनेश यांच्यामध्ये भांडणे देखील झाली होती. तीन दिवसांपूर्वी देखील दोघांमध्ये गल्लीत अशीच भांडण झाली असता गल्लीत भांडू नकोस पण घरात जाऊन बोलू, असे सुरेशने दिनेशला सांगून घरात नेले तिथे त्यांच्या अधिकच वाद वाढला. याच दरम्यान सुरेशने दिनेश याची लोखंडी हातोड्याने हत्या केली. मृतदेह गोणीमध्ये भरून काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडबंदर रोड येथील जंगलात खोदलेल्या खड्ड्यात पूरून टाकला असल्याची कबुली पोलिसांना दिली. समता नगर पोलिसांनी सुरेश विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

आत्महत्येचा बनाव करणारा व्हिडिओ : हे प्रकरण आता कस्तुरबा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणात आता कस्तुरबा पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे. दिनेश प्रजापति गायब असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने समता नगर पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. मात्र सुरेशने दिनेशच्या मोबाईलवरून त्याच्या पत्नीला मी आत्महत्या करत असल्याचा संदेश पाठवला. घोडबंदर रोड परिसरातील तलावाचे व्हिडिओ चित्रीकरण करून पाण्यात मोठा दगड टाकून आत्महत्येचा बनाव करणारा व्हिडिओ पाठवला होता.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime News: 56 वर्षीय व्यक्तीकडून 32 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची तुकडे करून हत्या; मुंबईत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती
  2. Mumbai Crime News: वसतिगृह हत्याकांड: विद्यार्थिनीने मृत्यूच्या तीन-चार दिवसांपूर्वी आईकडे सुरक्षारक्षकाची केली होती तक्रार
  3. Beed Crime News: जावयाला दुसरे लग्न करू न दिल्याने सासऱ्याचा खून? मुलाच्या विवाहाच्या तोंडावर केली हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details