महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घटनेला २४ तास उलटूनही दिव्यांश बेपत्ताच; आज पुन्हा होणार धरणे आंदोलन - open drianage

शोधपथकाने ड्रोन कॅमेऱयाद्वारेही दिव्यांशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अनेक ठिकाणी गटार फोडून दिव्यांशचा शोध घेण्यात येत आहे.

गटार फोडून दिव्यांशचा शोध घेण्यात येत आहे

By

Published : Jul 12, 2019, 8:55 AM IST

Updated : Jul 12, 2019, 9:27 AM IST

मुंबई - घराबाहेरील उघड्या नाल्यात पडलेला दिव्यांश सिंग हा चिमुकला २४ तास उलटुनही सापडला नाही. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रभात रहांगदले यांनी दिली.

२४ तास उलटुनही दिव्यांश बेपत्ताच

दिव्यांश सापडला नाही तर आज (शुक्रवारी) दुपारी पुन्हा एकदा गोरेगाव पूर्वेला आंबेडकर नगर चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दिव्यांशचे वडील सिरज सिंग यांनी याआधीही आंदोलन केले, मात्र, पोलीस आणि अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली होती. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.

शोधपथकाने ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही दिव्यांशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अनेक ठिकाणी गटार फोडून दिव्यांशचा शोध घेण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि आग्निशमन दल शोध मोहीम राबवत आहेत.

Last Updated : Jul 12, 2019, 9:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details