मुंबई : 10 ऑक्टोबर रोजी वांद्र्याच्या कार्टर रोड भागात वाढदिवस साजरा करतांना दोघांनी चुंबन घेत सेल्फी ( Kissing a minor girl ) काढला होता. आरोपींने या फोटोचा फायदा घेत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार ( minor girl raped ) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत आरोपीने हा सेल्फी व्हायरल करण्याची धमकी देऊन 17 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार केला. नंतर त्यांने तरुणीला बोहेर नेण्यासाठी प्रयत्न केला असता तरुणीने नकार दिला. त्यामुळे आरोपीने तीला मारहान देखील केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
POCSO कायदा अंतर्गत गुन्हा दाखल -या प्रकरणी "एका मैत्रिणीने तिच्या आई-वडिलांना मारहाणीची माहिती दिली.त्यानंतर पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. ही घटना खार पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कार्टर रोडच्या परिसरात घडली ( minor girl raped in Bandra ) असल्याने, केस आमच्याकडे हस्तांतरित करण्यात आली होती," असे खार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पुढे म्हणाले.
विधी संघर्ष बालकावर POCSO कायदा अंतर्गत गुन्हा दाखल आहे.