महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या - मुंबई जिल्हा बातमी

प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्याने प्रियकराने प्रयसीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jan 6, 2021, 7:04 PM IST

मुंबई -प्रेयसीचा खून करुन स्वतः आत्महत्या केल्याची घटना मालाड पूर्व येथील कुरार गावाजवळ सोमवारी (4 जाने.) घडली. निधी मिश्रा (वय 22 वर्षे), असे प्रेयसीचे नाव असून राहुल यादव (वय 28 वर्षे), असे प्रियकाराचे नाव आहे.

याबाबत सिवस्तर वृत्त असे, राहुल व निधी यांच्यात प्रेमसंबंध होते. नोव्हेंबर, 2020 मध्ये राहुलने निधीच्या घरच्यांकडे लग्नासाठी मागणी केली होती. पण, निधीच्या घरच्यांना यास विरोध होता. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या मुलासह निधीचे लग्न ठरविले व साखरपुडा केला. पण, राहुलला हे मान्य नव्हते. त्याने निधीला मालाड येथील एका ठिकाणी भेटण्यास बोलविले. यावेळी राहुलने सोबत आणलेल्या गावठी पिस्तुलातून निधीला गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली.

तीन दिवसांपूर्वी मागवली होती गावठी पिस्तूल

राहुल यादव व निधी मिश्रा दोघेही उत्तरप्रदेशातील जौनपूर जिल्ह्याचे मुळचे रहिवासी होते. घटनेच्या तीन दिवसांपूर्वी राहुलने जौनपूर जिल्ह्यातील मोहम्मदपूर येथून गावठी पिस्तूल मागवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा -इंस्टाग्राम वापरकर्त्यांनो सावधान..! हॅकर्स करताहेत कॉपीराईट फिशिंग

हेही वाचा -लष्करासाठी माहिती मिळवण्याकरिता बैठकीमध्ये घेतला होता सहभाग - लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित

ABOUT THE AUTHOR

...view details