महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Johnson Baby : जॉन्सन बेबी टॅल्कम पावडर वापरण्यासाठी योग्य, प्रयोगशाळेचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

जॉन्सन अँड जॉन्सनने बेबी टॅल्कम पावडर ( Johnson Baby Talcum Powder ) वापरासाठी सुरक्षित असल्याचा अहवाल उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश ( Order to state government to clarify its position on Johnson Baby Talcum Powder ) उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Johnson Baby
Johnson Baby

By

Published : Dec 2, 2022, 10:43 PM IST

मुंबई - जॉन्सन जॉन्सन अँड जॉन्सनने बेबी टाल्कम पावडर ( Johnson Baby Talcum Powder ) ही वापरासाठी सुरक्षित असल्याचा अहवाल दोन प्रयोगशाळांनी दिल्याचे शुक्रवारी उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) स्पष्ट झाले आहे. त्यावर या बालप्रसाधनाच्या विक्रीस परवानगी देण्याची मागणी जॉन्सन कंपनीकडून करण्यात आली. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश ( Order to state government to clarify its position on Johnson Baby Talcum Powder ) न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिले. त्यामुळे आता बेबी पावरडच्या विक्रीची परवानगी ( Permission to sell Baby Power ) सरकारच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.

जॉन्सन बेबी पावडर असुरक्षित - कंपनीच्या मुलुंड येथील प्रकल्पातून बेबी पावडरचे तीन दिवसांत नमुने घेऊन नव्याने चाचणीसाठी पाठवा असे आदेश खंडपीठाने राज्य अन्न, औषध प्रशासन विभागाला दिले आहेत. हे नमुने केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा, एफडीए प्रयोगशाळा, इंटरटेक या मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील खासगी प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवावेत. तसेच या नमुन्यांचा तीन आठवड्यांत चाचणीचा अहवाल सादर करावा असे न्यायालयाने मागील सुनावणीदरम्यान स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारी न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. जी. चपळगावर यांच्या खंडपीठासमोर खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा राज्य सरकारच्यावतीने तीन सीलबंद अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले. दोन सरकारी प्रयोगशाळांच्या अहवालानुसार बेबी पावडर प्रथमदर्शनी वापरण्यास सुरक्षित असल्याचे न्यायालयाने नमूद केले.या अहवालांचा आधारावर बेबी पावडरच्या विक्री करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कंपनीच्यावतीने ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी न्यायालयाकडे केली. मात्र अहवालाबाबत सरकारची बाजू ऐकणे आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने सुनावणी 6 डिसेंबर रोजी निश्चित केली.



काय आहे प्रकरण -जॉन्सन बेबी टाल्कम पावडर या प्रसिद्ध उत्पादनात निर्माण झालेल्या जीवाणूंच्या प्रचंड वाढीला नियंत्रित करण्यासाठी केलेली प्रक्रिया ही आरोग्यासाठी हानीकारक ठरत असल्याने एफडीएने कंपनीचा परवाना 15 सप्टेंबर 2022 पासून जॉन्सन कंपनीचा परवाना रद्द करण्याचा आदेश दिले. त्यानंतर पाच दिवसांनी या आदेशाचे पुनरावलोकन करत कंपनीला मुंबईच्या मुलुंड येथील प्रकल्पात सुरू असलेल्या बेबी पावडरचे उत्पादन व विक्री थांबवण्यास सांगण्यात आले. एफडीएच्या मंत्र्यांसमोर या आदेशाला आव्हान दिले. ते फेटाळताना त्यांनी मुलुंड येथील उत्पादन-विक्री थांबवण्याचे आदेशाला स्थगिती देण्याची मागणीही फेटाळून लावली. त्यामुळे अखेर जॉन्सन कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details