महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ, क्रिकेट बुकीने केला 'हा' आरोप - उद्धव ठाकरे

क्रिकेट बुकी म्हणून नामचीन असलेल्या सोनू जालान याच्यासह केतन तन्ना या दोन व्यक्तींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे.

Bookie Sonu Jalan ON Parambir Singh
परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ, क्रिकेट बुकीने केला 'हा' आरोप

By

Published : May 3, 2021, 4:50 PM IST

मुंबई - मुंबई पोलीस खात्याचे माजी पोलीस आयुक्त व सध्या राज्याच्या गृहरक्षक विभागाचे प्रमुखपद भूषविणाऱ्या परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झालेली आहे. क्रिकेट बुकी म्हणून नामचीन असलेल्या सोनू जालान याच्यासह केतन तन्ना या दोन व्यक्तींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे.

2018 मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करून उकळले 3 कोटी 45 लाख
2018 मध्ये ठाणे पोलीस आयुक्तपदी असणाऱ्या परमबीर सिंग यांच्याकडून मोक्का खाली सोनू जालान याच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर तब्बल 3 कोटी 45 लाख रुपये उकळण्याचा आरोप सोनू जालान याने केला आहे. यासंदर्भातील तक्रार अर्ज क्रिकेट बुकी सोनू जालान याने मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व पोलीस महासंचालक यांना केल्याची माहिती मिळत आहे.

ठाणे पोलीस आयुक्त असताना क्रिकेट बुकी सोनू जालान याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळेस ठाणे पोलीस विभागातील तत्कालीन पोलीस अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा व कोथमिरे नावाच्या अधिकार्‍यांवर सुद्धा सोनू जालान याने आरोप केलेले आहेत. याबरोबरच केतन तन्ना नावाच्या व्यक्तीने परमबीर सिंग यांच्यावर आरोप करत त्याच्याकडून 1 कोटी 25 लाख रुपये धमकी देऊन वसूल केल्याचा आरोप त्याने केलेला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून योग्य ती चौकशी करण्यात यावी व यामध्ये दोषी आढळणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रिकेट बुकी सोनू जालान व केतन तन्ना या दोघांनी केली आहे.

हेही वाचा -केकेआरच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण; कोलकाता-बंगळुरूचा सामना रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details