मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत विधी अभ्यासक्रमासाठी परीक्षा अर्ज जनरेट झाला ( law course examination application Difficulties ) नाही. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे विद्यार्थ्यांचे चौथ्या सत्राचे गुण संकेतस्थळावर नोंदवले गेलेच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा ( 4th semester marks not reported on website ) पडली.
तांत्रिक गोंधळामुळे समस्या : मुंबई विद्यापीठाच्या ( Bombay University ) विधी शाखेसाठी विद्यार्थी परीक्षा अर्ज करिता प्रवेश नोंदवत आहेत. मात्र विद्यापीठाच्या तांत्रिक गोंधळामुळे अनुभवलेली समस्या त्यामुळे चौथ्या सत्राचे गुण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दिसतच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण झालेली आहे.
प्रवेश प्रक्रिया रखडली :मुंबई विद्यापीठाशी संबंधित जे विविध महाविद्यालये आहेत त्यांनी या संदर्भात विद्यापीठाकडे पाठपुरावा केलेला आहे. अद्यापही समस्या सुटलेली नाही. मात्र या समस्यांमुळे काही विद्यार्थ्यांची विधी शाखेच्या तिसऱ्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया राखली ( students admission process stopped ) आहे. जरी अडचण अशी सुरू राहिली तर विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसेल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आसन क्रमांक मिळणार नाही .परीक्षा प्रवेश पत्र देखील मिळू शकणार नाही अशी स्थिती झालेली आहे.
डेटा भरला नाही :यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांच्यासोबत संवाद केला असता त्यांनी सांगितले की, "गेली दोन वर्षे झाले विधी महाविद्यालयांनी प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा जो काही डेटा भरायला हवा होता. तो भरला गेलेला नाही. त्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. एमकेसीएलच्या पोर्टलवर सत्र पाच चा डेटा विधी विद्यालयांनी भरणे बाकी आहे. मात्र त्यांना पुन्हा विद्यार्थ्यांचा डेटा भरण्यासाठी आता पुन्हा सवलत दिलेली आहे. हा डेटा भरला गेला की हे अडचणी तात्काळ दूर होतील असे त्यांनी स्पष्ट केले."