मुंबई :राष्ट्रवादीचे नेते वमाजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप असल्यामुळे तसेच त्यांना या आरोपाप्रकरणी अनेक महिने तुरुंगात राहावे लागले होते. तरी अद्याप सदर प्रकरणाची पूर्ण चौकशी झालेली नाही. या प्रकरणातील एक मुख्य आरोपी मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी सचिन वाझे हा सध्या तळोजा तुरुंगात आहे. त्याची देखील चौकशी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी मंत्री अनिल देशमुख यांना देखील मुंबई सोडून इतरत्र कोठे जाता येणार नाही, अशा प्रकारची ही बंदी घातली होती. यामधून त्यांना आता दिलासा मिळाला आहे.
अनुमती मिळावी म्हणून अर्ज :मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रोकडे यांच्यासमोर या प्रकरणी अनिल देशमुख यांनी मुंबई आणि इतरत्र ठिकाणी कामकाजासाठी जाण्याबाबत अनुमती मिळावी म्हणून अर्ज केला होता. ईडीने चौकशी होईपर्यंत मुंबई आणि मुंबईच्या बाहेर त्यांना इतरत्र कुठे जाऊ देता कामा नये, अशा स्वरूपाची मागणी केली होती. परंतु आता अनिल देशमुख यांच्या मागणीवर न्यायालयाने विचार करत त्यांना मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देशात कुठेही जाता येईल, असे निर्देश दिले. मात्र यामध्ये एक महत्त्वाची अट घातली. ती म्हणजे फक्त 26 एप्रिल 2023 पर्यंतच ते मुंबईच्या बाहेर मुंबई किंवा देशात फिरू शकतात. मात्र त्यानंतर त्यांच्यावरील बंदी पुन्हा तसेच कायम लागू राहील, असे न्यायमूर्ती रोकडे यांनी म्हटले आहे.