महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Loud Speaker On Mosque : रुग्णालयाजवळील मशिदीवर भोंगा चालणार नाही, उच्च न्यायालयाची ताकीद, पोलिसांना मागितला कारवाईचा तपशील - मशिदीच्या भोंग्यावरून मुंबई उच्च न्यायालय

रुग्णालयाजवळ वाजणाऱ्या मशिदीच्या भोंग्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नियमानुसार कारवाई करावी, अन्यथा न्यायालयाचा अवमान समजून पोलिसांवरच कारवाई केली जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय

By

Published : May 3, 2023, 5:45 PM IST

मुंबई : कांदिवली येथील कामगार रुग्णालयाच्या 90 मीटर अंतरावर मशिदीचा भोंगा वाजत असल्यामुळे या प्रकरणी वाद उच्च न्यायालयात पोहोचला होता. यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी ध्वनी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणी काय केली? नियमबाह्य पद्धतीने भोंगा वाजत असेल तर ते रोखण्यासाठी काय केले? आणि कृती अहवालासकट प्रतिज्ञापत्र सादर करा, असे सक्त आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

वकील रीना रिचर्ड यांची उच्च न्यायालयात धाव : रुग्णालयाच्या 90 मीटर अंतरावरच एका खाजगी मशिदीवर मोठ्या आवाजात भोंगा वाजतो. त्यामुळे जनतेला त्रास होतो. यामुळे वकील रीना रिचर्ड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी आपल्या याचिकेमध्ये नमूद केले की, 'या आधी देखील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ओक यांच्या खंडपीठाने सक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर काही काळ हा भोंगा बंद राहिला. पण आता पुन्हा मोठ्या आवाजामध्ये हा भोंगा वाजत असल्यामुळे याच्यावर ताबडतोब कारवाई करावी', अशी मागणी अ‍ॅडव्होकेट रीना रिचर्ड यांनी केली होती.

पोलिसांना सक्त कारवाईचे आदेश देण्याची मागणी : याचिकेमध्ये अ‍ॅडव्होकेट रीना यांनी मांडले की, 'सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निकालानुसार रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर लावण्यासाठी मनाई केलेली आहे. तसेच खाजगी असो किंवा सार्वजनिक कोणत्याही ठिकाणी लाऊड स्पीकरचा आवाज हा आपल्या कंपाऊंडच्या बाहेर जायलाच नको, हे देखील सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या आदेशात नमूद असल्याचं अ‍ॅडव्होकेट रीना यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच ही देखील बाब न्यायालयाच्या समोर मांडली गेली की, 'जिथे रुग्णालय आहे ते रुग्णालय शांतता झोनमध्ये येतं. तरी सुद्धा अशा ठिकाणी मोठ्या आवाजात मशिद वरील भोंगा रोज वाजत राहतो. यामुळे रुग्णांना आणि इतर जनतेला त्रास होतो. म्हणून हे ताबडतोब थांबले पाहिजे. यासाठी पोलिसांना न्यायालयाने सक्त कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी देखील वकील रीना यांनी याचिकेमध्ये केली आहे.

कारवाई प्रतिज्ञापत्राद्वारे सांगण्याचे आदेश : डीसीपी झोन 12 च्या पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली की, 'मशिदीचा हा जो परिसर आहे तो सायलेंट झोन मध्ये येत नाही. परंतु न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी ताबडतोब त्यांना नियमाची आठवण करून देत रुग्णालय जिथे असतं तिथेच सायलेंट झोन असतो हे सांगितले. शंभर मीटरच्या आत या भोंग्याचा आवाज येतो. त्यामुळे आपण काय कारवाई करता हे आम्हाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगा, असे त्यांनी म्हटले. जर तुम्ही आम्ही दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही तर कोर्टाचा अवमान केला म्हणून तुमच्यावर देखील आम्ही कारवाई करू, असा सज्जड दम न्यायालयाने डीसीपी झोन 12 चे पोलीस अधिकारी यांना दिला.

हेही वाचा :JEE Mains Percentile Eligibility : जेईई मेन्समधील पात्रता अट आम्ही हटवू शकत नाही - उच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details