मुंबई Bombay High Court News : घरात सासरची मंडळी टोमणे मारत असल्याचं म्हणत सुनेनं सासू-सासरे व नवरा यांच्या विरोधात 498 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला. मात्र उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई, न्यायमूर्ती एन बोरकर यांच्या खंडपीठानं असा निर्वाळा करत सुनेनं सासरच्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द केला.
Bombay High Court News : घरात टोमणे मारणं म्हणजे छळ नाही, सुनेकडून दाखल केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द - कलम 498
Bombay High Court News : सासरच्यांनी घरात टोमणे मारणे म्हणजे छळ नाही, असं निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयानं सुनेनं सासरच्यांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द केला.
Published : Nov 10, 2023, 8:02 AM IST
|Updated : Nov 10, 2023, 10:34 AM IST
कलम 498 अंतर्गत केला होता गुन्हा दाखल : 2018 मध्ये मुलीनं ज्या मुलाशी लग्न केलं होतं तो त्या सासू-सासर्यांनी दत्तक घेतलेला होता. लग्न झाल्यानंतर सुनेला सासरच्यांकडून रोज शेरे, टोमणे मारले जात होते. तसंच लग्न झाल्यानंतर सासू-सासरे यांच्याकडून तिला घरामध्ये ठिकठिकाणी या ठिकाणी हात लावू नको, या ठिकाणी स्पर्श करू नको. रेफ्रिजरेटरला स्पर्श करू नको, असं सातत्यानं तिला म्हटल्यानं विवाहितेनं पोलिसांकडे कलम 498 अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर हा छळ आहे. ही क्रूरता आहे, असं म्हणत तिनं उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता.
नवऱ्यानं दुबईत छळ केल्याचा आरोप : हा गुन्हा दाखल केल्यानंतर ती नवऱ्यासोबत दुबईला गेली. दुबईमध्येही नवऱ्यानं तिला शेरे, टोमणे मारले. त्यानंतर ती काही दिवस तिच्या पालकांच्या घरी आली. यानंतर नवऱ्यानंदेखील छळ केल्याचा आरोप विवाहितेनं केला. पोलिसांत गुन्हा दाखल असल्यानं हा खटला उच्च न्यायालयामध्ये वर्ग झाला. संबंधित पोलीस ठाण्याकडून त्या सासू-सासऱ्यांच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलं होतं. ज्यात नवऱ्याचंही नाव होतं. यादरम्यान सासूचा मृत्यू झाला. त्यामुळं सासरा आणि नवरा यांनी सासूचं नाव खटल्यातून वगळावे ही केलेली विनंती न्यायालयानं मान्य केली होती. यासंदर्भात न्यायालयानं वकिलांमार्फत दोन्ही पक्षकरांची बाजू ऐकल्यानंतर निर्वाळा देत सासू सासऱ्यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द केला.
हेही वाचा :
- Bombay High Court : शेजारील महिलेला दिवाळीला विश केलं अन् पतीचा तोडला पाय; न्यायालयाचे थेट पोलीस आयुक्तांना दिले चौकशीचे आदेश
- Jet Airways Workers : जेट एअरवेज कामगारांना २० वर्षानंतर न्याय; संपूर्ण पगारासहीत कामावर घेण्याचे आदेश
- chhagan bhujbal on Maratha reservation: 2 दिवसांत कुणबी नोंदीचा आकडा कसा वाढला-छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणावरून सवाल