मुंबई :मुंबई उच्च न्यायालयाने आपले निकाल मराठी भाषेत वेबसाइटवर अपलोड करण्यास सुरुवात केली. उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर नागरिकांसाठी मराठीत अनुवादित केलेले निकाल तपासण्यासाठी एक स्वतंत्र आणि समर्पित विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे निवाडे वेबसाइटच्या होम पेजवर 'निवडक निर्णय'(निवडलेले निर्णय) या पर्यायमध्ये मिळू शकतात. आत्तापर्यंत, 20 फेब्रुवारी रोजी सुनावलेले असे तीन निवाडे अपलोड करण्यात आले आहेत.
निकालांचे भाषांतर :हा निर्णय भारताचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निर्णयाच्या नंतर देशभर प्रत्येक उच्च न्यायालयामध्ये लागू करण्यात येत आहे. भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी 25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी नवीन सेवा सुरू केली होती. मराठीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये आतापर्यंत 2,900 हून अधिक निकालांचे भाषांतर करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक अटकेतील आदेश : मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्णय मराठीमध्ये अपलोड केलेले आहेत. या निकालांमध्ये न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर आणि कमल खता यांच्या खंडपीठाने सुनावलेला एक, निवाडा न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर आणि अभय आहुजा यांच्या खंडपीठाने दिलेला आणि न्यायमूर्ती अजय गडकरी आणि प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने सुनावलेल्या निकालांचा समावेश आहे. न्यायमूर्ती ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिलेले दोन आदेश करविषयक प्रकरणांशी संबंधित असताना, न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने दिलेला एक प्रतिबंधात्मक अटकेतील आदेश आहे.