मुंबई : दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा हा पर्याय आहे. मुंबईत अशीच एक घटना घडली होती. 32 वर्षाच्या आरोपीने 13 वर्षाच्या मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला होता. आरोपी हातीन मुलींचा बाप आहे. पीडिता एकटी असल्याचे पाहून तिला एका निवांत जागी नेऊन त्याने अनेकदा बलात्कार केला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत खटला दाखल केला.
आरोपीची बाजू खोडून काढली :आरोपी हा एका तांत्रिक कार्यशाळेमध्ये कामाला होता. जेव्हा तो त्या ठिकाणी काम करायचा त्याच्या जवळच तेरा वर्षाची मुलगी राहत होती. ती एकटी असल्याचा फायदा घेवून त्याने तिला तोंड दाबून त्या मुलीला वर्कशॉपमध्ये नेले. तिथे पुन्हा पुन्हा बलात्कार केला. आरोपीच्या वतीने वकिलांनी दावा केला होता की, त्याच्याकडून चूक झालेली आहे. एफआयआर तर उशिरा दाखल झालेला आहे, ही बाजू ऐकून न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपीची बाजू खोडून काढली. म्हटले की, अनेकदा बलात्कार केला. एकट्या मुलीला निर्जन जागी नेऊन बलात्कार करणे आणि उशिरा गुन्हा नोंदवणे, याचा अर्थ गुन्हा केला. ही बाब असत्य ठरत नाही. सत्य ठरते ते म्हणजे गुन्हा घडलेला आहे. त्यामुळेच याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.