रियाला बेल की जेल? पुढील सुनावणीपर्यंत बॉम्बे हायकोर्टाकडून निर्णय सुरक्षित - रिया चक्रवर्ती
सध्या जामीन याचिकेवर कोर्टाने आदेश सुरक्षित ठेवला आहे. रिया आणि शोविक यांच्या जामीन अर्जांवर आज न्यायमूर्ती सारंग कोतवाल ह्यांच्या पीठाने सुनावणी केली.
रियाला बेल की जेल? पुढील सुनावणीपर्यंत बॉम्बे हायकोर्टाकडून निर्णय सुरक्षित
मुंबई -मुंबई हायकोर्टाने मंगळवारी ड्रग्ज चॅट प्रकरणात तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. सुनावणीदरम्यान रिया आणि शौविक यांचे वकील सतीश मानेशिंदे आणि एनसीबी यांनी आपापले युक्तिवाद सादर केले. सध्या जामीन याचिकेवर कोर्टाने हा आदेश सुरक्षित ठेवला आहे. रिया आणि शोविक यांच्या जामीन अर्जांवर आज न्यायमूर्ती सारंग कोतवाल ह्यांच्या पीठाने सुनावणी केली.
या मुद्द्यांवर झाला युक्तिवाद -
- एनसीबीनुसार एसएसआरच्या मृत्यूच्या प्रकरणातील ड्रग्ज अँगलशी संबंधित आहे हे लक्षात घेऊन एनसीबीने केलेले तपास कोणतेही कार्यक्षेत्र नाही आणि बेकायदेशीर आहेत, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार निर्देश दिले होते की, सुशांतसिंग मृत्यूशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग केली जातील. त्यामुळे ही चौकशी बेकायदेशीर असल्याचे आढळले आहे.
- रियावर ज्या गुन्ह्यांकरिता जी कलमे लावलेली आहे ती जामीनपात्र आहेत आणि कलम 27A सध्याच्या प्रकरणात लागू होऊ शकत नाहीत.
- एनडीपीएसच्या कलम 37 नुसार जामिनावरील बंदी केवळ व्यावसायिक प्रमाणांवर लागू आहे आणि रियाच्या बाबतीत हे कलम लागू होत नाही.
NCBचे वकील अनिल सिंग यांचा युक्तिवाद -
- चौकशीची टाइमलाइन आणि ते सर्व कसे कनेक्ट होते ते दर्शविण्यासाठी एएसजीने सादर केला चार्ट
- एएसजी : हे एक ड्रग्स सिंडिकेट असल्याचे दिसत आहे, तसेच ते सर्व एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
- आपण एकत्रितपणे ड्रग्जविरोधात लढा दिला पाहिजे. तरुण विद्यार्थी पण ड्रग्जमध्ये अडकलेले आहेत आणि प्रभावशाली लोकांनी अशी उदाहरणे देऊ नयेत याची काळजी घ्यावी.
- कायद्याचा उद्देश लक्षात घेणे गरजेचे आहे. आपण आपल्या नवीन पिढीचे संरक्षण केले पाहिजे.