मुंबई :मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे आणि न्यायाधीश एस. जी. डीगे यांच्या खंडपीठांसमोर एक महत्त्वाची याचिका सुनावणीसाठी आली होती. 19 वर्षीय मुलगा आणि त्याच्यापेक्षा कमी वयाची मुलगी यांच्यामध्ये मैत्री होती. 19 वर्षे मुलाने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हे दोन्ही, मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या आई-वडिलांना न कळवता ते एकत्र राहत होते. त्यांच्या या वागण्यामुळे गैरसमज निर्माण झाला. म्हणून एफआयआर रद्द केला, असे मुलीच्या आईच्या बाजूने म्हणणे होते.
लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा : मुलीच्या आईची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाकडून महत्त्वाचे निरीक्षण नमूद करण्यात आले की, जी काही पार्श्वभूमी याचीकेमधून समोर आलेली आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकल्यावर अपराध ज्याने केला आहे. त्या 19 वर्षीय मुला विरोधात जर अत्यंत कडक स्वरूपात कारवाई केली. तर ते विपरीत होऊ शकतो. तो मुलगा आणि त्यापेक्षा कमी वयाची मुलगी या दोघांना त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात, त्याच कारण ते परिपूर्ण समजदार नाहीत. पीडित मुलीच्या आईच्या वतीने 2021 मध्ये 26 नोव्हेंबर या दिवशी भारतीय दंड विधान कलम 363 च्या अनुसार एफआयआर दाखल केली गेली होती. कारण तिची मुलगी पंधरा वर्षाची आहे. ज्याने तो अत्याचार केला तो 19 वर्षाचा मुलगा आहे, त्यामुळे पोस्को अंतर्गत देखील याबाबत लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदवला गेला होता.