महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Salman Khan: पत्रकार धमकी प्रकरणात सलमानला हायकोर्टाचा दिलासा

पत्रकाराने व्हिडिओ शूट केला म्हणून त्याला धमकी दिल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज सलमान खानला दिलासा दिला आहे.

Salman Khan
सलमान खानला अखेर दिलासा

By

Published : Mar 30, 2023, 12:18 PM IST

Updated : Mar 30, 2023, 12:31 PM IST

मुंबई: पत्रकारांने सलमान खान सायकल चालवत असतानाचे काही व्हिडिओ चित्रित केले होते. त्यामुळे सलमानने पत्रकाराला धमकी दिली होती. याप्रकरणी पोलीसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायदंडाधिकारीने त्याबाबत सलमानला समन्स बजावले होते. त्या समन्सला सलमान खान हजर राहू शकला नाही त्यामुळे उच्च न्यायालयात त्याला धाव घ्यावी लागली. आज उच्च न्यायालयाने सलमान खानला याप्रकरणात दिलासा दिला. सलमान खानवर दाखल केलेली एफआयआर न्यायालयाने रद्द केली आहे. तसेच जारी केलेला समन्स देखील उच्च न्यायालयाने रद्द केला.





पत्रकारानी काढले होते फोटो: सलमान खान जेव्हा 2019 मध्ये रस्त्यावर दिसला. तेव्हा काही पत्रकारांनी सलमान खानचा फोटो काढण्याचा प्रयत्न केले होते. सेलिब्रिटी असल्याने स्वाभाविक पत्रकारांनी काही फोटो काढले. तेव्हा सायकल चालवत असलेल्या सलमान खानने पत्रकाराकडील कॅमेरा हिसकावला. तसेच पत्रकारांसोबत गैरवर्तनदेखील केले.असा आरोप ठेवत पत्रकाराने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. अंधेरी न्यायालयाने सलमान खानला या प्रकरणांमध्ये तक्रारदाराच्या याचिकेनुसार समन्स बजावले होते. त्याबाबत सलमान खानने उच्च न्यायालयामध्ये त्या समन्स विरोधात धाव घेतली आहे.



पत्रकाराला दिली धमकी: सलमान खानने केवळ एवढेच नाही तर त्या पत्रकाराला धमकी देखील दिली होती. तसेच असभ्य भाषेत बोलला असा देखील आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. सलमान सारख्या सेलिब्रिटीकडून ही अपेक्षा नव्हती. त्याचे कारण सेलिब्रिटींना जनता आणि मीडिया ही जेव्हा भेटते त्यावेळेला त्याच्यासोबत संवाद करत असते. मात्र सलमान खानने याबाबत फोटो काढला असता कॅमेरा काढून घेत गैरवर्तन केले असे याचिककर्ताने म्हटले. याबाबत सलमान खानच्या विरोधात तक्रार नोंदल्यानंतर कनिष्ठ न्यायालयामध्ये सुनावणीसाठी हे प्रकरण गेले. त्यावेळेला कनिष्ठ न्यायालयामध्ये याचिका गेल्यानंतर सलमान खानला त्याबाबत दिलासा मिळाला होता. मात्र अंधेरी न्यायालयाने सलमान खानला या प्रकरणांमध्ये तक्रारदाराच्या याचिकेनुसार समन्स बजावले होते. मात्र सलमान खान याने समन्स बजावल्यानंतर हजेरी लावली नव्हती.





सलमान खानला दिलासा: सलमान खानने अंधेरी न्यायालयामध्ये ही याचिका रद्द करावी या मागणीसाठी अर्ज केला होता. मात्र तो स्वीकारला गेला नव्हता. अंधेरी न्यायालयाने बजावलेला समन्सला अखेर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याची भूमिका सलमान खानने घेतली. त्यामुळे याबाबत काय निर्णय होतो, त्याकडे मुंबई आणि राज्य आणि देशातील सलमानच्या चहात्याचे लक्ष लागलेले होते.



हेही वाचा: Bombay High Court मुंबई उच्च न्यायालयात आज सलमान खान अनुष्का शर्मा आणि नवाज उद्दीन सिद्दीकी यांच्या प्रकरणांवर सुनावणी

Last Updated : Mar 30, 2023, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details