मुंबई: पीडित मुलाचा अपघातामध्ये गुढ मृत्यू झाला आहे. त्यामुळे चौकशी व्हावी यासंदर्भात याचिका पीडित मुलाच्या नातेवाईकाने दाखल केली होती. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे एस गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश डी नाईक यांच्या खंडपीठाने पुरण पोलीस ठाण्याला आदेश दिले. या संदर्भात घटनेची कालबद्ध पद्धतीने चौकशी करावी. तसेच ही चौकशी नियमानुसार करून त्याचा अहवाल देखील न्यायालयाला सादर करावा असे देखील आदेश न्यायालयाने दिले.
प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश: लहान मुलावर ज्याने लैंगिक अत्याचार केला त्या संशयित आरोपीचे नाव डॉक्टर अब्दुल रहमान अंजरिया आहे. ज्याने मुलावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पोस्को कायद्याअंतर्गत अब्दुल रहमान अंजारीयावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर 2020 पासून तो मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी पोलिसांना सापडला नाही. तसेच ज्याच्यावर अल्पवयीन असताना अत्याचार झाला होता. त्यांचा 28 सप्टेंबर 2022 रोजी उरण मध्ये ट्रकने धडक दिल्यामुळे अपघातात मृत्यू झाला. त्या संदर्भात पुढील सुनावणी नऊ मार्च रोजी होणार आहे. मात्र उरण पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेला सीआर क्रमांक 275 2022 या याचिकेला उत्तर म्हणून, सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देतो असे देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नमूद केले. तसेच या गुन्ह्यांमधील हेतूबाबत याचिका करता यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भात देखील चौकशी होणे जरुरी आहे हे देखील नमूद केले.
संक्षिप्त अहवाल दाखल: मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर याचिका कर्त्याच्या संदर्भातील बाजू अधिवक्ता घनश्याम उपाध्याय आणि अधिवक्ता मनोज सिंह या दोन्ही वकिलांनी मांडली. मात्र सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले की, तपास अधिकाऱ्याने या प्रकरणाचा संक्षिप्त अहवाल दाखल केला आहे. खटला बंद केला आहे. हे कळताच मुंबई उच्च न्यायालयाने गंभीरपणे या सगळ्याची नोंद घेत नवी मुंबई पोलिसांना तपास अधिकाऱ्यांची भूमिका नेमकी काय आहे हे देखील पाहण्यास बजावले आहे.