महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bombay High Court News  : विनापरवानगी गृहनिर्माण संकुलात कुर्बानी देणे चुकीचे, तातडीने कारवाईचे मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश - विनापरवानगी कुर्बानी

मुंबईतील काही गृहनिर्माण संस्थांमध्ये विनापरवानगी बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्याचे काम सुरू होते. परंतु याला स्थानिक रहिवाशी लोकांनी जे त्या रहिवासी संकुलात राहत होते, त्यांनी विरोध केला आणि मुंबई उच्च न्यायालयात नाव घेतली. तर उच्च न्यायालयाने विनापरवानगी रहिवासी संकुलात अशी कुर्बानी देता येत नाही, असे निर्देश दिले. महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिकेला हे निर्देश न्यायालयाने बुधवारी दिले.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Jun 29, 2023, 7:26 AM IST

Updated : Jun 29, 2023, 7:36 AM IST

मुंबई :मुंबईतील भायखळा येथील नागपाडा पोलीस हद्दीमध्ये रहिवासी संकुलात तसेच त्या बाजूच्या मुंबई सेंट्रल सीट नाथांनी हाइट्स या गृहनिर्माण संकुलात विनापरवानगी बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्याचे काम सुरू होते. म्हणजे त्या निमित्ताने तशी सर्व तयारी तेथे सुरू होती. परंतु या ठिकाणी मुस्लिम तसेच जैन धर्म देखील राहतात. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी सोसायटीच्या आतमध्ये कुर्बानीसारखे प्रकार करू नये, अशी मागणी जैन धर्मीय रहिवाशांनी केली होती.


तातडीने याचिकेवर सुनावणी :यासंदर्भात नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये देखील स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली. परंतु प्रकरण उच्च न्यायालयात हरेश जैन आणि अपेक्षा शहा या दोन नागरिकांनी नेले. मुंबई उच्च न्यायालयात तातडीची युद्ध पातळीवरील बाब म्हणून या याचिकेवर सुनावणी घेण्याचा उच्च न्यायालयाकडे त्यांनी आग्रह धरला. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर याची बुधवारी उशिरा सुनावणी झाली. न्यायालयाचे कामकाज आटोपल्यानंतर ही याचिका सुनावणीस आली. न्यायालयाला उशिरा ही याचिका घ्यावी लागली.



वेगवेगळ्या धर्माचे लोक : न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने या संदर्भात दोन्ही पक्षाकारांची बाजू ऐकून घेतली. जैन धर्मिय रहिवाशांचे म्हणणे होते की, येथे इतर धर्मपण राहतात. पण गृहनिर्माण संस्थेच्या आतमध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. त्यामुळे आतमध्ये कुर्बानी सारखा प्रकार करू नये, तर कुर्बानीच्या बाजूने याचीकी मध्ये मुद्दा मांडण्यात आला की आमचा सण आहे. त्यामुळे याला त्या दृष्टीने पहावे. परंतु दोघेही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्देश दिले की, परवानगी घेतल्याशिवाय अशा प्रकारचे कुर्बानीचे कार्यक्रम गृहनिर्माण संस्थेमध्ये करू नये. तसेच महाराष्ट्र शासनाने देखील यासंदर्भात आणि मुंबई महानगरपालिकेला देखील या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

कुर्बानीवरून दोन गटात झाला वाद : मुंबईतील मिरा रोडमधील एका सोसायटीत बकरी-ईदच्या कुर्बानीसाठी दोन बकरे आणण्यात आले होते. सोसायटीच्या लोकांना जेव्हा कुर्बानीसाठी बकरी आणण्यात आले असल्याची माहिती मिळाली तेव्हा सोसायटीमध्ये गोंधळ निर्माण झाला होते. दोन गटात वाद झाल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले होते. सोसायटीच्या आवारात आंदोलन करणाऱ्या लोकांना श्रीरामचे नारे दिले होते.

हेही वाचा :

  1. Ashadhi Ekadashi 2023: हिंदू मुस्लिम एकतेचा अनोखा प्रयोग, पोलिसांच्या आवाहनाला मुस्लिम बांधवांचा 100 टक्के प्रतिसाद, कुर्बानी न करण्याचा निर्णय
  2. Hindu Muslim Unity : मुस्लिम हिंदू एकतेचे अनोखे उदाहरण; आषाढी एकादशी असल्याने ईदला 41 गावात होणार नाही कुर्बानी
  3. Ashadhi Ekadashi 2023: अनोखे हिंदु मुस्लिम ऐक्य, बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा 'या' गावात निर्णय
Last Updated : Jun 29, 2023, 7:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details