महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rakhi Sawant News: न्यायालयाने राखी सावंतला फटकारले; मीडियामध्ये 'तो' व्हिडिओ प्रसारित केल्याबाबत वर्तनावर प्रश्नचिन्ह केले उपस्थित - Bombay High Court objected

अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत राहते. नुकताच राखी सावंतने एका मॉडेलच्या बाबतीत व्हिडिओ प्रसारित केला होता. त्या मॉडेलने राखी सावंत विरुद्ध एफआयआर नोंदवला होता. त्यामध्ये स्पष्टपणे तक्रारदार महिलेविषयी लैंगिक उद्देश त्यात दाखवले गेले होते. ज्यामुळे तक्रार महिलेची बदनामी आणि अवमानदेखील झाला. मीडियामध्ये व्हिडिओ प्रसारित केल्याबाबत न्यायालयाने तिच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Rakhi Sawant News
न्यायालयाने राखी सावंतला फटकारले

By

Published : Mar 26, 2023, 7:20 AM IST

मुंबई :मुंबई उच्च न्यायालयाचे एकल न्यायाधीश खंडपीठाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर राखी सावंत यांचा खटला शनिवारी सुनावणीसाठी सुरू झाला होता. यानंतर न्यायमूर्ती यांनी राखी सावंत तिच्या वर्तनावर काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले. दुसऱ्या महिलेच्या संदर्भात आपण काही व्हिडिओ प्रसारित करताना काही नैतिक निकष राखायला पाहिजे, तसेच आपण दुसऱ्याच्या संदर्भात कोणतीही मानहानी होणार नाही, हे पाहिले पाहिजे. आपल्या व्हिडिओमुळे दुसऱ्याची बदनामी आणि जर त्याला त्रास होत असेल तर आपण ते करू नये.




न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले :या प्रकरणात न्यायालयाने काही प्रश्न देखील उपस्थित केले जसे की, राखी सावंतने हा व्हिडिओ दाखवला का? नंतर तो फॉरवर्ड केला गेला का? मग तो प्रसारित कसा झाला? आणि मग तो व्हिडिओ मीडियाच्या लोकांना फॉरवर्ड केला गेला का? आणि मग ती प्रकाशित करा, असे का म्हणाली? अन्यथा या कलमांतर्गत शिक्षाही केवळ पाच वर्षाची आहे. आणखी काय करता येईल? बदनामीचा तपास पोलीस कसा करणार? हे सर्व प्रसार माध्यमांनी प्रसारित केले म्हणून एफआयआर करा, असे सांगत नाही. परंतु एफआयआरमध्येच म्हटले आहे, की व्हिडिओ आधीच उपलब्ध आहे.


व्हिडिओ युट्युबवर अपलोड करण्यात आला : तक्रारदार महिलेच्या वकिलांनी न्यायालयाला ही बाब नजरेस आणून दिली की, राखी सावंतने पत्रकार परिषदेमध्ये जो व्हिडिओ दाखवला तो युट्युबवर अपलोड करण्यात आला. त्यामुळे तो एकापेक्षा अनेक लोकांना तो पाहण्यासाठी उपलब्ध झाला. यानंतर मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ उपलब्ध असल्यास त्वरित काढून टाकला जाईल, याची खात्री केली. त्यादृष्टीने पावले देखील उचलण्यास न्यायालयाने पोलिसांना सांगितले. न्यायालयाने हे देखील नमूद केले की, प्रसारमाध्यमांमध्ये हा व्हिडिओ प्रसारित झाला असेल, तर काढून टाकायला हवा. केवळ मुलाखत नाही तर पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आलेला अश्लील व्हिडिओ देखील हटवला जावा, असे कोर्टाने ताशेरे ओढले आहेत.


पती आदिल दुर्राणीच्या विरोधात तक्रार : राखी सावंतने काही दिवसांपूर्वी पती आदिल दुर्राणीच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. राखीने तिच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. राखीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोपदेखील केला होता. आदिल खान दुर्राणीने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे, असा आरोप देखील राखीने केला आहे. याप्रकरणी राखी सावंतने म्हैसूर कोर्टात तक्रार दाखल केली होती.


हेही वाचा : Dubai tour for Rakhi Sawat : राखी सावंतची दुबईत डान्स अकॅडमी सुरू, मिळाले घर आणि गाडी

ABOUT THE AUTHOR

...view details