मुंबई :कुठल्याही विद्यार्थ्यांने दहावीमध्ये जर विज्ञान विषय घेतला नसेल, तो अकरावीला गेला. परंतु बारावीला त्याने विज्ञान विषय घेतला, तर हे महाराष्ट्र परीक्षा मंडळाच्या नियमात बसत नाही; असे कारण दाखवत नाशिक येथील एका विद्यार्थ्याला राज्याच्या परीक्षा मंडळाने तो विज्ञान परीक्षेला बसला म्हणून त्याचे निकाल पत्र रोखून धरले. ते अवैध असल्याचा आदेश दिला होता. त्या विरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता बोर्डाचा तो निकाल रद्द केला. तसेच त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल देत अखेर त्याला न्याय दिला. शुक्रवारी झालेल्या तातडीच्या खटल्यातील सुनावणी वेळी न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला. त्या निकालाचे आदेश पत्र नुकतेच जारी करण्यात आले.
परीक्षेमध्ये अपात्र :नाशिकमधील कृष्ण राकेश चोरडिया हा गार्गी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत होता. ही शाळा इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन आयसीएसई मंडळाशी संलग्न आहे. इयत्ता दहावीत त्याला 92 टक्के गुण मिळाले. परंतु दहावीनंतर अकरा इयत्ता अकरावीमध्ये त्याने पहिली श्रेणी मिळवली. बारावीला त्याने विज्ञान विषय निवडला, त्याला परीक्षा दिल्यानंतर तेथेच परीक्षेमध्ये अपात्र घोषित केले गेले.
परीक्षा मंडळाचा नियम :14 वर्षाचा विद्यार्थी एखादी विषय निवडतो, म्हणजे ती भविष्याची निवड आहे असा समज करून घेणे उचित नाही. केवळ त्या विद्यार्थ्याने दहावीला विज्ञान विषय घेतला नाही, म्हणून त्याला त्यानंतर शिक्षणासाठी त्याला विज्ञान विषय मिळत नाही किंवा निवडता येत नाही, हा जो परीक्षा मंडळाचा नियम उचित नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये म्हटले आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने या संदर्भात सुनावणी करताना महत्त्वपूर्ण निकाल दिला.
Bombay High Court: दहावीमध्ये विज्ञान नसल्याने पुन्हा बारावीला निवडता येत नाही, हा परीक्षा मंडळाचा नियम अनुचित- न्यायालय - Examination Board Rules subject chosen
दहावीमध्ये विज्ञान विषय घेतला नाही म्हणून बारावीला विज्ञान विषय निवडता येत नाही, हा परीक्षा मंडळाचा नियम अनुचित असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. विज्ञान, कला आणि कॉमर्स हा जुना शिक्षण पॅटर्न बदलला पाहिजे. कृष्ण राजेंद्र चोरडिया विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यात उच्च न्यायालयाने महत्त्वाचा दिला निकाल आहे.
मुंबई उच्च न्यायालय