मुंबई : अभिनेत्री राखी सावंत यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. आज झालेल्या सुनावणी दरम्यान सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. या अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. राखीवर शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात आंबोली पोलिसांनी राखीची चौकशी केली होती.
आपत्तीजनक वक्तव्य केल्याचा आरोप : मुंबईतील अंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले आहे. शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याचा राखीवर आरोप आहे. काही वेळेत अभिनेत्रीला अंधेरी कोर्टात हजर केले जाणार आहे. मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने राखी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता राखीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शर्लिन चोप्राने स्वत आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
राखी सावंत अटकेत : शर्लिन चोप्राने ट्विट करत अंबोली पोलिसांनी राखीला अटक केल्याचे सांगितले आहे. सोबतच शर्लिन चोप्राने आपल्या एफआरआयबाबत अतिरिक्त माहितीसुद्धा नमूद केली आहे. नुकतेच समोर आलेल्या नव्या माहितीनुसार राखी सावंतने शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याने शर्लिन चोप्राने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यासाठी तिला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे.