मुंबई :एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणातील आरोपी लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला ( Bombay High Court Relief Anand Teltumbde ) आहे. 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला ( Anand Teltumbde granted bail ) आहे. तेलतुंबडे यांना 14 एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली (Urban Naxalism case) होती.
पक्षकारांचा युक्तिवाद :न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठांसमोर दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गेल्या आठवड्यात निर्णय राखून ठेवल्यानंतर आज हा निकाल दिला आहे. न्यायालयाने म्हटले की तेलतुंबडे यांच्याविरुद्ध कलम 38 आणि 39 दहशतवादी संघटनेतील सदस्यत्वाशी संबंधित फक्त गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यांमध्ये कमाल शिक्षा 10 वर्षे तुरुंगवासाची होती आणि तेलतुंबडे यापूर्वी 2 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला होता. त्यामुळे न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.NIA ला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी वेळ देण्यात यावा जोपर्यंत अनिल तेलतुंबडे यांना कारागृहातून मुक्तता करण्यात येऊ नये अशी विनंती न्यायालयाकडे केल्यानंतर न्यायालयाने आपल्या आदेशाला आठवडाभरासाठी स्थगिती दिली आहे. एनआयएच्या वतीने वकील संदेश पाटील यांनीअसे युक्तिवाद केला की कार्यक्रमात केलेल्या भाषणांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा कथित पाठिंबा होता.
अटक करण्यात आली होती :एल्गार परिषद प्रकरणात आनंद तेलतुंबडे देखीलआरोपी आहेत. भीमा कोरेगाव येथे 31 डिसेंबर 2017 आणि 1 जानेवारी 2018 दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आनंद तेलतुंबडेंना अटक करण्यात आली होती. भीमा कोरेगाव एल्गार परिषद या प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी, मिलिंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, वरवरा राव यांच्यासह आठजणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
याआधी काय झालं होतं? :भीमा कोरेगावप्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत संपल्यानंतर लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी मुंबईतल्या NIA कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण केलं होतं. आनंद तेलतुंबडे यांनी NIAच्या कार्यालयात जाऊन 14 एप्रिल रोजी आत्मसमर्पण केलं होतं. त्यावेळी प्रकाश आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे, आनंद आंबेडकर, आमदार कपिल पाटील उपस्थित होते. यानंतर कोर्टाने त्यांना 18 एप्रिलपर्यंत NIAच्या कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला होता. आता विशेष न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. 8 एप्रिल रोजी त्यांना आत्मसमर्पणासाठी मुदत वाढवून देताना यानंतर मात्र अतिरिक्त वेळ मिळणार नाही असं न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपाठीने स्पष्ट केलं होतं. या दोन आरोपींसंदर्भात शिथिल करण्यात आलेली वेळ अन्य खटल्यांना लागू होणार नाही तसंच हा नवा पायंडा नसेल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करत दोन्ही आरोपी समर्पित करतील असं आम्हाला वाटलं होतं. मुंबईत कोर्टांचं कामकाज सुरू आहे. परंतु त्यांनी तसं केलं नाही. दोघांनाही पुरेसा वेळ देण्यात आला होता. त्यांच्या वयाचा प्रकृतीचा विचार करून एका आठवड्याची मुदत देण्यात येत आहे मात्र एका आठवड्यानंतर त्या दोघांना न्यायालयासमोर आत्मसमर्पण करावं लागेल असंही सुप्रीम कोर्टाने तेव्हा म्हटलं होतं.
नेमकी घटना काय :कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी 1 जानेवारी 2018 रोजी लोक जमले होते. 1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धात पेशव्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ब्रिटीशांनी त्यांच्या विजयाचे प्रतिक आणि त्यांच्या बाजूने लढलेल्या सैनिकांच्या स्मृतीत भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला होता. या युद्धाला आणि विजय दिवसाला 200 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे नागरिक जमले होते. विजय दिवस साजरा होत असतानाच काही समाज कंटकांकडून या कार्यक्रमाला गालबोट लावले आणि काही हिंसक घटना घडल्या. पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर येथून हिंसक घटनांना सुरुवात झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी राज्यभर या हिंसक घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.