मुंबई :मुंबईमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत कथित गैरव्यवहार झाला आहे. त्यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा संबंध असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याबाबत त्यांनी त्या तक्रारीला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने चार आठवड्याचा दिलासा मागच्यावेळी दिला होता, आता तो 11 जूनपर्यंत वाढवलेला आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील जमिनीच्या संदर्भात अनेक पातळीवर खरेदी विक्री करण्यात आली. त्यामध्ये गैरव्यवहार झाला.
नोंदवलेला गुन्हा बनावट :यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा हात असल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर किशोरी पेडणेकर यांना संबंधित प्राधिकरणाने नोटीस देखील बजावली होती. या प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर त्यांच्यावरील झालेले हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच त्यांच्यावर केले गेलेले आरोप आणि त्याबद्दल नोंदवलेला गुन्हा हा बनावट असल्याचे म्हणत तो रद्द करावा, अशी त्यांनी मागणी केली होती. याचिकेत त्या प्रकारची त्यांनी मागणी नमूद करत मुंबई पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेला एफआयआर हा रद्द करावा, असे त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केले होते.