मुंबई :मनी लॅन्डरिंग केसबाबत ईडीच्यावतीने जेट एयरवेजचे पूर्व प्रमुख नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांच्या विरोधात तक्रारीची दखल घेत तपास सुरू करण्यात आला होता. मात्र हा सुरू असलेल्या तपासाता क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी सादर केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण व न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने तपास थांबवण्याचे आदेश दिले आहेत. नरेश गोयल आणि पत्नी अनिता गोयल यांनी त्याबाबतची विनंती केली आहे. परिणामी ईडीलाही आता त्या आदेशाचे पालन करणे भाग आहे.
राजेंद्रन नेरुपारंबिल यांची तक्रार :अनुभवी वकील रवि कदम तसेच प्रख्यात वकील आबाद पोंडा यांनी बाजू मांडत असे म्हटले की, ईसीआईआर तपासणी जर ईडीला करायची असेल तर गुन्हा घडलाच पाहिजे असे आवश्यक नाही. हे न्यायालयाने लक्षात घ्यावे. त्यांनी पुढे असेही नमूद केले की एमएमआर मार्ग पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी सी समरी अहवाल दाखल केला होता. राजेंद्रन नेरुपारंबिल हे अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य वित्तीय अधिकारी होते. त्यांनी जेट एअरवेज आणि गोयल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी 9 नोव्हेंबर रोजी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.