मुंबई - चौकीदार चोर है, या विधानानंतर राहुल गांधी यांच्यावर मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल करत खटला नोंदवला. त्या संदर्भातील खटल्याची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सारंग कोतवाल खंडपीठासमोर पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज असे निर्देश पारित केले की "गोरेगाव न्यायदंडाधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील निर्देश येईपर्यंत कोणतेही आदेश देऊ नये." राहुल गांधी यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे.
तारीख पे तारीख -राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर खटला हा खालच्या न्यायालयातून मुंबई उच्च न्यायालयात वर्ग झाला. त्या अनुषंगाने तारीख पे तारीख असे करत आज अखेर सुनावणी झाली. राहुल गांधी यांच्या वकिलांनी त्यांना दिलासा मिळण्यासंदर्भात निवेदन सादर केले. न्यायालयाने त्यासंदर्भात प्रश्न केला, त्या उत्तरात राहुल गांधी यांच्या वतीने सांगितले की आपण गोरेगाव न्याय दंडाधिकारी यांना आदेश द्यावे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आदेश जारी केले की, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश येईपर्यंत गोरेगाव न्याय दंडाधिकारी यांनी कोणतेही आदेश राहुल गांधींच्या खटल्या संदर्भात देऊ नये.
RELIF TO RAHUL GANDHI : 'चौकीदार चोर' प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना मोठा दिलासा - relief to Rahul Gandhi
मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधानांच्याबाबत चौकीदार चोर है असे विधान त्यांनी केले होते. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत गिरगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्देश देऊ नये असे आदेश दिले आहेत.
काय कारण होतं राहुल गांधींवर खटला दाखल- 2018 मध्ये देशामधील राफेल विमान खरेदी प्रकरण यावर रणकंदन माजलेलं असताना राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात,' चौकीदार चोर है...' असे उपहासात्मक विधान केले होते. या त्यांच्या विधानावर देशभर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याचा परिणाम म्हणून मुंबईमध्ये गिरगाव पोलीस ठाणे या ठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या एका कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर महानगर दंडाधिकारी यांच्याकडे ती तक्रार खटल्याच्या स्वरूपात दाखल झाली. त्यांनी मानहानीचा खटला दाखल करून घेतला. 2019 मध्ये महानगर दंडाधिकारी यांनी फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश या खटल्याच्या निमित्ताने दिले होते.
राहुल गांधी यांना मोठा दिलासा -या फौजदारी खटल्याच्या कारवाई निमित्ताने राहुल गांधी यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. 28 ऑगस्ट 2019 या दिवशी फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने राहुल गांधी यांना समन्स आदेश बजावले गेले होते. या महानगर दंडाधिकारी यांनी बजावलेल्या समन्स आदेशाच्या विरोधात राहुल गांधी यांच्या वकिलांनी अधिवक्ता पासबोला यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेले आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.