मुंबई : ईडीने (2020)मध्ये एका ट्रॅव्हल एजन्सीच्या तक्रारीवरून एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात मुंबई पोलिसांनी केलेल्या एफआयआरची दखल घेतली होती. (2021)मध्ये मुंबई पोलिसांनी जेट एअरवेज नरेश गोयल आणि अनिता गोयल यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट देखील दाखल करण्यात आला होता. ईडीने विरोध केला असतानाही न्यायालयाने हा अहवाल स्वीकारला होता. गोयल दांपत्य यांच्यावतीने वरिष्ठ वकील रवी कदम आणि वरिष्ठ वकील आबाद पोंडा यांच्यामार्फत अंतरिम दिलासा मागण्यात आला होता. या (ECIR)मधून त्यांच्या विरोधात पुढील तपास केला जाऊ नये. या ईसीआयआरच्या संदर्भात याचिकाकर्त्यांविरुद्ध कोणतीही जबरदस्ती पावले उचलू नयेत, अशी मागणीही युक्तीवादा दरम्यान करण्यात आली होती.
ईडीने ईसीआर नोंदवला होता : या दांपत्याच्या विरोधात मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या एफआयआरच्या आधारे ईडीने ईसीआर नोंदवला होता. या विरोधात गोयल दांपत्यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर गोयल दांपत्यांना उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज के चव्हाण यांच्या खंडपीठाने अंतिम दिलासा दिला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 31 जानेवारी रोजी होणार आहे.