मुंबई -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh Bail Case ) यांच्या विरोधात 100 कोटी कथित वसुली ( Anil Deshmukh Extortion Case ) प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी उच्च न्यायालयाने ( Bombay High Court Given Term To CBI ) सीबीआयला 10 दिवसाची मुदत दिली होती. ही मुदत संपल्याने पुन्हा मुदत वाढवून देण्यात यावी यासाठी अर्ज करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयचा अर्ज मंजूर करत 27 डिसेंबरपर्यंत मुदत दिली. आज ही मुदत संपणार आहे. सीबीआयने ( Court Given Term To CBI Will Finish Today ) पुन्हा उच्च न्यायालयात मुदत वाढवून देण्यासाठी धाव घेतली मात्र उच्च न्यायलयाने आज जामीन स्थगितीला मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग एकप्रकारे मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 10 दिवसाची मुदतअनिल देशमुख ( Anil Deshmukh Bail Case ) यांना 12 डिसेंबर रोजी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला होता. उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 10 दिवसाची मुदत सीबीआयला उच्च न्यायालयाने दिली होती. मुदत संपण्यापूर्वीच सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या ( Bombay High Court Given Term To CBI ) निर्णयाला आव्हान दिले आहे. मात्र ख्रिसमस व्हेकेशनमुळे कोर्टाला सुट्टी असल्याने सुनावणी होऊ शकत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती 3 जानेवारीपर्यंत वाढवून देण्यात, यावी अशी मागणी सीबीआयच्या वतीने उच्च न्यायालयात ( Court Given Term To CBI Will Finish Today ) करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत पुन्हा सीबीआयला मुदत वाढवून दिली होती.