मुंबई :मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि पि.के. चव्हाण यांच्या खंडपीठाने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अन्याकारक अटकेबाबत शासनाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यावर काँग्रेस कार्यकर्त्याने टीका केली होती. या टीकेनंतर त्यांना अटक झाली. म्हणून संदीप अर्जुन कुडाले यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला ताशेरे ओढत दंड देखील ठोठावला. तसेच कायदा वापर हा असंतोष रोखण्यासाठी करावा, कोणाला धमकावण्यासाठी करू नये; अशी तंबी शासनाला दिली.
व्हिडिओचे परीक्षण केल्यानंतर तपासणी : महाराष्ट्रात सोशल मीडियावर कथित मंत्री पाटील यांच्याविरुद्ध काही अपमानकारक टीका केली गेली. म्हणून दोन गुन्हे नोंदवले गेले होते. त्यानंतर पुढील गुन्हे म्हणजे भारतीय दंड विधान कलम 133 ए अंतर्गत देखील गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या सोशल मीडियावरील व्हिडिओचे परीक्षण केल्यानंतर कोर्टाने या संदर्भात संपूर्ण तपासणी केली असता आणि सामग्री पाहिली असता निरीक्षण नोंदवले की, तिथे कोणतीही बेकायदेशीर लोक एकत्र जमलेले नव्हते. कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला असे दिसत नाही.
अपशब्द वापरला गेलेला नाही : तसेच न्यायमूर्तींनी हे देखील निरीक्षण नमूद केले की, ज्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये व्हिडिओ तयार केला गेला. तो प्रसारित केला गेला. त्यामध्ये असा कोणताही अपशब्द वापरला गेलेला नाही. जेव्हा खरोखर गुन्हा घडला असेल, आणि अवमानजनक अपमानजनक काही म्हटले गेले असेल तेव्हाच गुन्हे दाखल करायला हवे. मात्र कुडाले यांनी केवळ सरकारच्या मंत्र्याचा निषेध व्यक्त केला आणि मतभेद नोंदवला, तर मतभेद नोंदवणे हा गुन्हा ठरू शकत नाही असे देखील न्यायालयाने अधोरेखित केले.