महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bombay High Court: 'या' कारणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधातील याचिका - सावित्रीबाई फुले यांचा अवमान

भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरत होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान केल्याप्रकरणी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Mar 27, 2023, 1:33 PM IST

मुंबई :भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या द्वि सदस्य खंडपीठाने न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे यांनी याचिका कर्त्याची ही याचिका फेटाळून लावली. भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याचे याचिकेमध्ये म्हटले होते. मागच्या तीन महिन्यापूर्वी राज्यामध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी भाजपाचे खासदार यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी रान उठवले होते.

उच्च न्यायालयात याचिका : राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात असंतोष उफाळून आला होता. जनतेने याबाबत टीका केली होती. विरोधी पक्षांनी देखील याबाबत राज्यपालांना प्रश्न विचारले होते की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात ज्यांनी क्रांती केली, अश्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत राज्यपालांनी अवमानकारक विधाने केली आहेत, असे म्हणत या सर्व पार्श्वभूमीवर याचिककर्ता वतीने राज्यपालांच्या या विधानाची दखल घ्यावी, तसेच कोश्यारींवर कारवाई करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच याबाबत मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील तक्रार केली होती.

समाजाचे प्रबोधन करण्याचा हेतू :मुंबई उच्च न्यायालयाने याचिका संदर्भात निरीक्षण नोंदवले आणि सांगितले की, या पद्धतीची विधाने इतिहासाच्या विश्लेषणाचे स्वरूप पद्धतीचे असतात. कोश्यारींचा हेतू समाजाचे प्रबोधन करण्याचा होता. कोणत्याही महान व्यक्तीचा अनादर करण्याचा नव्हता. न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अभय वाघवसे यांच्या खंडपीठाने कोश्यारींनी केलेली विधाने ‘इतिहासाचे विश्लेषण’ या स्वरूपाची आहेत. त्यांचा उद्देश हा इतिहासाबद्दल ‘समाजाचे प्रबोधन’ करण्याचा आहे, असे मत व्यक्त केले.

विधानांमागील हेतू :संदर्भित विधाने इतिहासाच्या विश्लेषणाचे स्वरूप आहेत. इतिहासातून शिकायचे धडे आहेत. ही विधाने प्रामुख्याने त्या व्यक्तींबद्दल वक्त्याची धारणा आणि मते प्रतिबिंबित करतात, ज्यांच्याकडे ते व्यक्त केले गेले आहेत, त्या श्रोत्यांना पटवून देण्याच्या उद्देशाने, समाजासाठी चांगले असेल अशा प्रकारे विचार करणे आणि वागणे हा त्यामागे उद्देश होता. समाजाचे प्रबोधन करणे असा या विधानांमागील हेतू आहे.

सकारात्मक हेतूने विधाने : तसेच याचिककर्ता यांनी याचिकेत नमूद केलेल्या मुद्द्यावरून लक्षात येते की, राज्यपालांच्या विधानाकडे अशा दृष्टीने पाहिले की, ते महान व्यक्तींचा अनादर करत आहे. मात्र राज्यपालांचे विधान आपण काळजीपूर्वक ऐकली आणि वाचली तर त्या संदर्भात समाजामध्ये काहीतरी चांगल्या हेतूने महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत विचार करावा, अशा सकारात्मक हेतूने त्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले.

हेही वाचा : Bhagat Singh Koshyari Controversies : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त कारकीर्दीवर एक दृष्टीक्षेप

ABOUT THE AUTHOR

...view details