मुंबई : बेस्ट प्रशासनाचा अजबच कारभार समोर आला आहे. बेस्ट कर्मचाऱ्याने आपल्या मुलाच्या आजारपणात सुटी घेतली. परिणामी सलग सुटी पडल्याने बेस्ट प्रशासनाने एका कामगाराला कामावरून काढून टाकले. यादरम्यान, कामगाराच्या मुलाचा देखील अखेर मृत्यु झाला. मात्र, बेस्ट प्रशासनाने त्या कामगाराला कामावरून काढून टाकले. न्याय मिळण्यासाठी कामगाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने बेस्टला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण? : बेस्टमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा मुलगा आजारी पडला. त्याच्या मुलावर उपचार सुरू असताना देखील तो दुरूस्त होत नव्हता. घरी पत्नी एकटीच असल्याने या कर्मचाऱ्याला मुलाच्या उपचारासाठी देखभाल करण्यासाठी कामावरून सुटी घ्यावी लागली. या कर्मचाऱ्याने बेस्ट प्रशासनाकडे मुलगा आजरी असल्याने सुटीसाठी विनंती अर्ज दाखल केला होता. मात्र, बेस्ट प्रशासनाने त्याला अधिकची सुटी दिली नाही. कर्मचाऱ्याने सुटी घेतल्यानंतर मुलाच्या तब्येतीची देखभाल करू लागला. दरम्यान, मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कामगाराने त्याची सुटी वाढवली होती. मात्र, बेस्ट प्रशासनाने कोणतीही वैध प्रक्रिया देखील न करता त्याला कामावरून काढून टाकले, असा दावा कामगाराने करत अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
बेस्टने कामावरून काढले :अॅड. गायत्री सिंग यांनी न्यायालयात कामगाराची बाजू मांडली की, कामगाराला नाईलाजाने आपल्या मुलाच्या आजारपणात सुटी घ्यावी लागली. मोठ्या शहरात एकटी आई किती पुरे पडणार संगोपन करण्यात म्हणून आणि कर्तव्य तसेच बापाचे उत्तरदायित्व देखील आहे की मुलाला सेवा देणं देखभालीसाठी वेळ देणे. अखेर, तो मुलगा गंभीर आजारी होऊन मृत्यू पावला. मात्र, बेस्ट प्रशासनाने त्या कामगाराला कामावरून काढून टाकले.