मुंबई :मुंबई महापालिकेच्या खासगी अनुदानित शाळेतील मुख्याध्यापिकाच्या निवृत्तीनंतर त्यांच्या पेन्शनमध्ये कपात करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्चन्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती जी. पटेल, नीला गोखले यांच्या खंडपीठाने एस. निवृत्तीनंतर मुख्यध्यापकीचे पैसे कपात करता येणार नाही असा निर्णय दिला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकेला दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे आता अशा हजारो शिक्षक मुख्याध्यापकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सेवानिवृत्तीनतर सेवानिवृत्ती वेतन कपात :कल्पना परब खाजगिशाला 30 वर्षांपूर्वी मुंबईतील भांडुप येथील शाळेत रुजू झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी 10 वी क्राफ्टिंग कोर्स उत्तीर्ण केला होता. त्यानंतर त्या शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. नंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर मुख्यध्यापीका 2016 मध्ये सेवानिवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर दीड ते दोन वर्षांनी सेवानिवृत्ती वेतन मिळू लागले. मात्र, त्यांना रक्कम कमी मिळत होती. त्यांनी संबंधित अधिकारी, मुंबई महापालिका यांना याबाबत विचारणा केली; तेव्हा त्यांना निवृत्तीनंतर मुख्याध्यापक पदासाठी पाच वर्षांचा अनुभव असल्याशिवाय कोणत्याही शिक्षकाला मुख्याध्यापक पद मिळत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे तुमच्या पेन्शनमधून रक्कम कपात करण्यात येत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.