मुंबई - ड्रग्ज प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर रिया आज रिया घरी परतली आहे. मागील 8 सप्टेंबरला एनसीबीने अटक केल्यापासून रिया भायखळा कारागृहात होती.
रिया चक्रवर्ती एका महिन्यानंतर तुरुंगाबाहेर, हायकोर्टाकडून जामीन मंजूर - रिया चक्रवर्ती लेटेस्ट न्यूज
रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे भायखळा कारागृहात दाखल झाले आणि नंतर आज रिया घरी परतली आहे.
रियाला एक लाख आणि अन्य दोघांना 50 हजारांच्या जातमुचकल्यावर हा जामीन मंजूर झाला. पुढील दहा दिवस रियाला पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पासपोर्ट आणि अन्य कागदपत्र न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय तिला विदेशी प्रवास करणे किंवा बृहन्मुंबईच्या बाहेर जाता येणार नाही.
मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस.व्ही. कोतवाल यांनी मंगळवारी रिया चक्रवर्ती, शोक चक्रवर्ती, अब्दुल बासित परिहार, सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांच्या जामीन अर्जावरील निर्णय मंगळवारी राखून ठेवला. यावर्षी जूनमध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर एनसीबीकडून तपास सुरू आहे. याच प्रकरणी चौकशीनंतर सर्वांना अटक झाली होती.