मुंबई Bombay Dyeing Mill Deal :मुंबई शहरातील जागेला सोन्याचा भाव आल्याची चर्चा सातत्यानं सुरू असते. या चर्चेला पुष्टी देणारा जागेचा व्यवहार नुकताच झालाय. दक्षिण मुंबईमध्ये असलेल्या जागांचे दर हे गगनाला नेहमीच भिडलेले आढळतात. या परिसरात जागेचा दर हा सुमारे 70 हजार चौरस फुटांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळं या परिसरातील एक इंच जमिनीला हजारो रुपयांचा भाव आहे. दक्षिण मुंबईतील वरळी येथील पांडुरंग बुधकर मार्गावर असलेल्या बॉम्बे डाईंग मिल या मालमत्तेच्या सुमारे 18 एकर जमिनीचा व्यवहार 5000 कोटी रुपयांना एका जपानी कंपनीसोबत झाल्याची माहिती समोर आलीय.
जमिनीचा सर्वात मोठा व्यवहार :मुंबईतील जमिनीची विक्री आणि त्याला मिळणारा दर हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. विशेषत: दक्षिण मुंबईतील जागांना असलेला दर हा सर्वाधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांच्या रक्कमा पाहिल्या, तर त्या अवाढव्य असल्याचं दिसून येतं. वरळीतील पांडुरंग बुधकर मार्गावर बॉम्बे डाईंग मिलची जागा आहे. या जागेपैकी 18 एकर जागा विकण्यात आलीय. सुमितोमो नावाच्या एका जपानी कंपनीनं ही जागा विकत घेतलीय. या जागेच्या व्यवहारामुळं दक्षिण मुंबईतील जागेचा सर्वात मोठा व्यवहार ठरण्याची शक्यता आहे. या व्यवहारात वाडिया कुटुंबाचं दक्षिण मुंबईत म्हणजे वरळीत असलेलं कार्यालय विकलं जाणार आहे. या व्यवहारासंबंधी काही दिवसापूर्वीच एक सार्वजनिक नोटीस जारी केली होती. बॉम्बे डाईंग मिलच्या वरळी येथील जागेबाबत ही नोटीस जारी करण्यात आली होती. (Mumbai news)
काय सुरूय बॉम्बे डाईंग मिलमध्ये :बॉम्बे डाईंग मिलमध्ये वाडिया कुटुंबाचं कार्यालय कार्यरत होतं. हे कार्यालय सध्या दादर नायगाव येथील बॉम्बे डाईंगच्या मालमत्तेत स्थलांतरित करण्यात आलंय. वाडिया मुख्यालयाच्या पाठीमागील बाजूस अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या मालकीचं बास्तीयन रेस्टॉरंट होतं. हे देखील बंद करण्यात आलंय. सध्या बॉम्बे डाईंग येथील साहित्य स्थलांतरित करण्यात येतंय. त्यासाठी या मालमत्तेबाहेर वाहनांची रांग लागलीय. वाडिया कुटुंबाची ही मालमत्ता विकली जात असल्याबाबत वाडिया समूहाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (Bombay Dyeing Mill deal update)
आर्थिक स्टेटमेंट चुकीचे सादर केल्याबद्दल कारवाई :सेबीने वाडिया कुटुंब आणि मेहता यांना एका वर्षाच्या कालावधीसाठी, एका सूचीबद्ध कंपनीमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून रोखे बाजारातील व्यवहाराप्पासून गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात निर्बंध घातले आहेत. सेबीनं बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (बीडीएमसीएल), प्रवर्तक नुस्ली वाडिया, तसंच त्यांची मुले नेस वाडिया आणि जहांगीर वाडिया यांना कथित आर्थिक स्टेटमेंट्स चुकीच्या पद्धतीने सादर केल्याबद्दल भांडवली बाजारात प्रवेश करण्यापासून या कुटुंबाला दोन वर्षांसाठी प्रतिबंधित केला होता. त्यानंतर या कुटुंबानं आपली ही मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतलाय.
हेही वाचा :
- Jarandeshwar Sugar Mill Issue : जरंडेश्वर कारखान्यासाठी शालिनीताई मैदानात, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका
- Sugar Mill: राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत; सात साखर कारखान्यांना 'RRC'द्वारे नाेटीस
- Shahu mill: शाहू मिल पुन्हा सुरू! गणेशोत्सवात प्रत्येकाने पाहावा असा देखावा; पाहा व्हिडिओ