महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 25, 2022, 12:04 PM IST

ETV Bharat / state

Christmas 2022 : नाताळनिमित्त पालिकेकडून चर्चला रोपांचे वाटप ; वृक्षारोपणाचा दिला संदेश

ख्रिसमस निमित्ताने बॉम्बे कॅथोलिक सभा (Bombay Catholic Sabha) आणि मुंबई पालिका उद्यान विभाग (BMC Parks Department) यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट मायकल चर्च मुंबई येथे ४० हून अधिक रोपांचे वाटप करण्यात आले आहे. नाताळनिमित्त रोपे वाटप करण्याचे हे तिसरे वर्ष (Christmas 2022) आहे. यानिमित्ताने मुंबई हिरवीगार करण्याच्या संकल्पाला हातभार लावला जाणार (distributed 40 saplings at St Michaels Church) आहे.

Christmas 2022
नाताळनिमित्त पालिकेकडून चर्चना रोपांचे वाटप

मुंबई : मुंबई पालिका, उद्यान विभाग झाडांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून नाताळ सणाच्या निमित्ताने सलग तिसऱ्या वर्षी मुंबईतील चर्चला ४० रोपे देण्यात आली आहेत. ही रोपे चर्चच्या ठिकाणी लावून मुंबई हिरवीगार करण्याच्या संकल्पात हातभार लावला जाणार (distributed 40 saplings at St Michaels Church) आहे.

नाताळनिमित्त रोपांचे वाटप :बॉम्बे कॅथोलिक सभा आणि मुंबई पालिका उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने (Bombay Catholic Sabha and BMC Parks Department) ख्रिसमसच्या काळात सेंट मायकल चर्च मुंबई येथे ४० हून अधिक रोपांचे वाटप करण्यात आले (Christmas 2022) आहे. नाताळच्या काळात ख्रिश्चन समुदायाला हिरवीगार मुंबई बनवण्यासाठी आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी सदिच्छा म्हणून ही रोपे भेट म्हणून देण्यात आल्याची माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. नाताळनिमित्त रोपे वाटप करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. सेंट मायकल चर्च आणि तीर्थक्षेत्र महीमचे फादर लॅन्सी पिंटो यांनी झाडे लावण्याच्या संकल्पनेचे स्वागत केले असून ठिकठिकाणच्या चर्चमध्ये लावल्या जाणाऱ्या रोपांच्या माध्यमातून मुंबई हिरवीगार करण्याचे आशीर्वाद दिले.


मुंबई हिरवीगार करण्याचा संकल्प :मुंबईमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात झाडांची संख्या खूपच कमी आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये झाडांची संख्या वाढवण्यासाठी वर्टिकल गार्डन आणि टेरेस गार्डनवर भर देण्यात यावा, यासाठी नागरिक आणि सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा, असा सल्ला तज्ञ मंडळींनी पालिकेच्या उद्यान विभागाला दिला आहे. नागरिकांना विभागातील उद्यानाची आणि त्यात असलेल्या सुविधांची माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून नागरिक आपल्याला कोणत्या सुविधा असलेल्या उद्यानात जावे, याचा निर्णय घेवू शकतील अशी माहिती जितेंद्र परदेशी यांनी (distributed 40 saplings on Christmas) दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details