महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा धसका..!  'उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाची तपासणी करा' - मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयात येणाऱ्या नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उच्च न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याची मागणी 'बॉम्बे बार असोसिएशन'ने केली आहे.

बॉम्बे बार असोसिएशन
बॉम्बे बार असोसिएशन

By

Published : Mar 12, 2020, 4:18 PM IST

Updated : Mar 12, 2020, 5:11 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य सरकारकडून यावर उपाय योजनांसाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात येणाऱ्या नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उच्च न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याची मागणी 'बॉम्बे बार असोसिएशन'ने केली आहे.

कोरोना रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाची तपासणी करा - बॉम्बे बार असोसिएशन

उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर 'थर्मल गन'च्या सहाय्याने प्रत्येक व्यक्तीची तपासणी करूनच न्यायालयात प्रवेश देण्यात यावा. अशी मागणी 'बॉम्बे बार असोसिएशन' कडून मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात कोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक नागरिकाच्या शरीराचे तापमान मोजून यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अमलात आणावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा -नाथाभाऊंसाठी पक्षाने वेगळा प्लॅन आखला असेल - पंकजा मुंडे

मुंबई उच्च न्यायालयात एखादी संशयित व्यक्ती आढळल्यास त्या संदर्भात उपचारांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. याबरोबरच कोर्टातील याचिकांच्या सुनावणीसाठी गरजेच्या तारखांना फक्त संबंधित व्यक्तींना येण्याची परवानगी द्यावी, ही विनंती 'बॉम्बे बार असोसिएशन'ने केली आहे. यावर उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडून या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे 'बॉम्बे बार असोसिएशन'ने म्हटले आहे.

हेही वाचा -महाविकास आघाडी 'गो'

Last Updated : Mar 12, 2020, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details