महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत विमानतळावर बॉम्बस्फोट होणार, पोलीस अधिकाऱ्याचा फोन?

मुंबई आणि दिल्ली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर बॉम्ब स्फोट होणार असल्याचा कॉल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. दुसऱ्या राज्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने मुंबई पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन याची माहिती दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत बॉम्ब स्फोटाची धमकी
मुंबईत बॉम्ब स्फोटाची धमकी

By

Published : Aug 5, 2023, 12:57 PM IST

Updated : Aug 5, 2023, 3:43 PM IST

मुंबई : मुंबई आणि दिल्लीतील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब स्फोट होणार असल्याचा फोन मुंबई पोलीस कंट्रोलला आला आहे. पोलीस कंट्रोल रुममध्ये फोन आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. दुसऱ्या राज्यातील पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने मुंबई पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन याची माहिती दिली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने फोन करुन ही माहिती दिल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. सुरक्षा दलाने संपूर्ण विमानतळाची तपासणी केली आहे मात्र, कोणतीच संशयास्पद वस्तू आढळली नाही. यानंतर सुरक्षा यंत्रणा फोन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा तपास करत आहेत. दरम्यान मुंबई सहार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात 503 (2) आणि 505 (1)च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या दिवसांपासून बॉम्ब असल्याचे वृत्त येत असतात. परंतु तपासाअंती ते वृत्त अफवा असल्याचे निदर्शनास आले आहे.

याआधी आली होती अफवा: नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्लीहून मुंबईला जाणारे विस्तारा एअरलाइन्समध्ये बॉम्ब असल्याची विमान कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर तपासणीसाठी दोन तास विमान थांबवण्यात आली होते होते. उड्डाणापूर्वी विमानातील एका महिला प्रवाशानेच एअरलाइनच्या कर्मचाऱ्याला फोन करून बॉम्ब माहिती दिली होती. एक दिवसापूर्वी अशीच एक अफवा एका महिलेने पुणे विमानतळावर पसरली होती. दिल्लीला जाणाऱ्या महिलेने पुणे विमानतळावर सुरक्षा रक्षकाला आपल्याकडे बॉम्ब असल्याची खोटी बतावणी केली होती. चेकिंगसाठी वेळ लागत असल्याने तिने आपल्याकडे बॉम्ब असल्याची अफवा पसरवली होती. 17 जुलै रोजी दादर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याची अफवा एका व्यक्तीने पसरवली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी योगेश शिवाजी ढेरे नावाच्या व्यक्तीला अटक केली होती.

नाशिक-हैदराबाद विमानात बॉम्ब:नाशिक वरून हैदराबादला जाणाऱ्या विमानात जागा मिळाली नाही म्हणून प्रवाशाने फोन करून बॉम्ब असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती. ओझर विमानतळावरून हैदराबादला जाणाऱ्या विमानात तिकीट काढूनही जागा मिळाली नाही म्हणून प्रवाशाने बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली होती.

हेही वाचा

  1. Suspicious Bag In Dadar : दादर फुलबाजारात संशयास्पद बॅग आढळल्याने पोलिसांची तारांबळ; बॅगेत आढळला गांजा
  2. Mumbai Hoax call : चाळीत बॉम्ब ठेवल्याचा कॉल करणारा सापडताच पोलिसही चक्रावले..हट्ट पाहून काढली समजूत
Last Updated : Aug 5, 2023, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details