महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गौरी खानला नोटीस दिलीच नाही, ईडीकडून स्पष्टीकरण - Tulsiani Group

No notice given to Gauri Khan ED clarifies: अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला अंमलबजावणी संचालनालयानं (ED) नोटीस पाठवली असल्याच्या कथित बातम्या मीडियात झळकल्या होत्या. परंतु अशी नोटीस ईडीकडून पाठवली गेली नसल्याचं उघड झालं आहे.

ED sent a notice to SRK wife Gauri Khan
गौरी खानला ईडीने पाठवली नोटीस

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 7:27 PM IST

Updated : Dec 20, 2023, 6:44 PM IST

मुंबई -No notice given to Gauri Khan ED clarifies: अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला (Gauri Khan) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस पाठवली असल्याच्या कथित बातम्या मीडियामध्ये झळकल्या होत्या. मात्र अशा प्रकारची कोणतीही नोटीस ईडीकडून पाठवण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. अशा बातम्या मीडियात आल्यानंतर काही तासातच ईडीने या प्रकरणात शाहरुख खानच्या पत्नीला नोटीस पाठवली नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

गौरी ही लखनौ येथील रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्यामुळे या कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गौरी खानचीही कंपनीच्या इतरांसोबत चौकशी होणार असल्याची चूकीची प्रसिद्ध झाली होती. या नोटीसबाबत ईडी ऑफिसकडून तसेच गौरी खानकडून कोणताही दुजोरा मिळालेला नव्हता.

काय आहे तुलसियानी प्रकल्प? :चित्रपट निर्माती आणि इंटिरियर डिझायनर असलेल्या गौरी खानला तुलसियानी ग्रुपने 2015 मध्ये ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवले होते. कंपनीचा प्रोजेक्ट लखनौ येथे सुरू आहे. या गृहप्रकल्पातील एक घर मुंबईचे रहिवासी किरीट जसवंत शाह यांनी 2018 मध्ये 85 लाख रुपयांना खरेदी केले होते, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून आली होती. किरीट शाह यांनी आरोप केला होता की, त्यांना ना फ्लॅट दिला गेला, ना पैसे परत केले गेले. यानंतर त्यांनी कंपनीचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी यांच्यावर सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, असेही मीडिया रिपोर्टमध्ये समोर आले होते.

हा एकंदरीत प्रकार मीडियात प्रसिद्ध झाल्यामुळे अनेकांना गैरसमज झाला. परंतु, अशा प्रकारचे कोणतीही नोटीस अंमलबजावणी संचालनालयाने पाठवली नसल्याने ती गौरी खान यांना मिळण्याचा प्रश्नच येत नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

Last Updated : Dec 20, 2023, 6:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details