मुंबई : सेलिब्रिटीच्या मृत्यूने खारखरमध्ये खळबळ उडाली आहे.सारा यंथन (वय वर्ष 26) ही चित्रपटसृष्टीतील मेकअप आर्टिस्ट मंगळवारी रात्री खार दांडा येथील भाड्याच्या घरात राहत होती. तिच्या हातावर जखमा तसेच रक्तबंबाळ अवस्थेत पंख्याला लटकलेल्या स्थितीत मृतदेह आढळला आहे. मूळची नागालँड येथील सारा यंथन ही मुंबईत चित्रपट, टेलिव्हिजन आणि वेब सिरीजमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती.
बँकेत काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत साराचे संबंध होते आणि तो तिला लग्नासाठी बळजबरी करत होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. रविवारी सकाळपासून सारा फोनला प्रतिसाद देत नव्हती. त्यावेळी तिच्या फ्लॅटच्या भाड्याची रक्कम थकलेली असल्याने सोमवारी एजंट भाड्यासाठी पुन्हा तिच्या घरी गेला तेव्हा त्याला संशय आला. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली सोमवारी रात्री खार पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा सारा बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळली पोलिसांना तिच्या दोन्ही हातावर कापल्याच्या खुणाही दिसल्या आहेत. याप्रकरणी खार पोलिस आणि गुन्हे शाखा तपास करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदाज जसा आहे की, कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावला असावा.