मुंबई- मुंबईतील ७ मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली आहे. कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावण्यास सुरूवात केली असून अभिनेत्री रेखा यांनी नुकतेच मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील वांद्रा येथे आपले मत नोंदवले आहे.
Celebrities Voting: मुंबईत या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क - loksabha election
अभिनेत्री रेखा यांनी नुकतेच उत्तर मध्य मतदारसंघातील वांद्रे येथे आपले मत नोंदवले आहे.
कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
LIVE UPDATE
- १.५० - अभिनेता सलमान खान, सलीम खान आणि सलमा खान यांनी बजावला मतदानाचा हक्क
- १.४३ - करिना कपूरने मुंबईमध्ये केलं मतदान
- १२:५८ - हृतिक रोशनने कुटुंबासह जुहूमध्ये बजावला मतदानाचा हक्क
- १२:५७ - अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि जया बच्चन यांनी पार्ले जमनाबाई शाळेत केले मतदान
- १२.४८ - अभिनेता संजय दत्तने बजावला मतदानाचा हक्क.
- १२:३२ - गायक कैलास खेर यांनी जुहूच्या गांधी ग्राम शाळेमध्ये केले मतदान. हा लोकशाहीचा उत्सव असल्याचे सांगत केले मतदान करण्याचे आवाहन
- १२:२५ - जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी बजावला मतदानाचा हक्क. जुहूतील गांधी ग्राम शाळेमध्ये केले मतदान.
- १२.१० - मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने केले मतदान
- १२.०१ - हेमा मालिनी आणि ईशा देओलने बजावला मतदानाचा हक्क
- ११:४८ - बॉलिवूड क्वीन कंगना रनौतने मुंबईच्या खारमध्ये केलं मतदान
- ११.२८ - गुलजार यांनी बजावला मतदनाचा हक्क
- ११.२७ - अभिनेता इम्रान हाश्मीने वांद्रे येथे नोंदवले मत
- ११.०८ - अनुपम खेर यांनी जुहूमध्ये बजावला मतदानाचा हक्क
- ११.०२ - अभिनेत्री भाग्यश्रीने बजावला मतदानाचा हक्क
- १०:४३ - अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी बजावला मतदानाचा हक्क
- १०:३० - दिग्दर्शक विजय केंकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क
- १०:२८ - मराठी कलाकार चैत्राली आणि लोकेश गुप्ते यांनी बजावला मतदानाचा हक्क
- १०:२० - अभिनेत्री सोनाली बेंद्रेनी पती गोल्डी बहलसह बजावला मतदानाचा हक्क
- १०:०८ - अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावसह बजावला मतदानाचा हक्क
- १०:०६ - अजय देवगण आणि काजलने जुहूच्या विद्यानिधी विद्यालयामध्ये केले मतदान. सर्वांनी बाहेर पडून मतदान करावे, असे मतदारांना केले आवाहन.
- ९:४६ - माधुरी दीक्षित यांनी केले मतदान. जुहूमधील गांधी ग्राम शाळेमध्ये बजावला मतदानाचा हक्क
- ९:०३ - बिग बॉस फेम राजेश शृंगारपुरेने बजावला मतदानाचा हक्क
- ८:५७ - ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंनी जूहूमध्ये बजावला मतदानाचा हक्क
- ८:३५ - अभिनेता परेश रावल यांनी पत्नी स्वरूप यांच्यासह विले पार्ले येथे केले मतदान
- ८:३० - दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारेंनी केले मतदान.
- ८:२७ - अभिनेत्री सुरुची अडारकरने बजावला मतदानाचा हक्क
- ८:१६ - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी वांद्रेच्या पेटीट स्कूलमध्ये बजावला मतदानाचा हक्क. मतदान करण्याचे मतदारांना केले आवाहन
- ८:१० - प्रपंच, 405 आनंदवन या मालिकेच्या दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी गोरेगाव बिंबिसार नगर येथे बजवला मतदानाचा हक्क
- ७:५२ - रविकिशन यांनी बजावला मतदानाचा हक्क
- ७:५० - अभिनेत्री रेखाने वांद्रेमध्ये नोंदवले मत
Last Updated : Apr 29, 2019, 3:20 PM IST