महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टरला अटक - bollywood casting director arrested mumbai

काही दिवसांपूर्वीच दिंडोशी पोलिसांनी एका बॉलीवूड संबंधित सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यातही बॉलीवूडच्या 2 अभिनेत्रींचा समावेश होता.

Varsova police station
वर्सोवा पोलीस ठाणे

By

Published : Jan 16, 2020, 4:59 PM IST

Updated : Jan 16, 2020, 6:10 PM IST

मुंबई - सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बॉलिवूडच्या कास्टिंग डायरेक्टरला अटक करण्यात आली आहे. एका आठवड्यामध्ये बॉलिवूडशी संबंधित सेक्स रॅकेटप्रकरणी ही दुसरी कारवाई आहे. बॉलिवूडशी संबंधित कुमार आर्य ऑनलाईन आणि फोनवरून सेक्स रॅकेट चालवत होता.

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टरला अटक

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलवर छापा मारण्यात आला. त्यानुसार सेक्स रॅकेट चालविणाऱ्या बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या कुमार आर्य तसेच बॉलिवूडची एक अभिनेत्री आणि मेकअप आर्टिस्ट यांना अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच दिंडोशी पोलिसांनी एका बॉलीवूड संबंधित सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यातही बॉलीवूडच्या 2 अभिनेत्रींचा समावेश होता. यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करत वर्सोवा येथून 2 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - संजय राऊतांचे I AM सॉरी ! इंदिरा गांधींबद्दलचे विधान घेतले मागे

Last Updated : Jan 16, 2020, 6:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details