मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ,अनुराग कश्यप व विकास बहलच्या घरी आयकर विभागाच्या पथकाकडून धाडी मारण्यात आल्या आहेत. या तिघांच्या मुंबईतील निवासस्थानी व कार्यालयावरही छापेमारी सुरू असल्याची माहिती आयकर खात्याच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
या कलाकारांच्या घरावर छापा
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू दिग्दर्शक ,अनुराग कश्यप , विकास बहल यांच्या मुंबईतील कार्यालय व घरावर आयकर खात्याकडून बुधवारी छापेमारी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार फँटम फिल्म संबंधात ही छापेमारी करण्यात आलेली असून मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे.
इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फँटम फिल्म कडून मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्स ची चोरी करण्यात आलेला असल्याचा आयकर विभागाला संशय आहे. मुंबईतील शास्त्री नगर जोगेश्वरी येथे फँटम फिल्म चे कार्यालय असून , गोरेगाव परिसरामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू ही राहत असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली असल्याचेही आयकर सूत्रांकडून कळत आहे.