महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ranbir Kapoor: महादेव ॲप घोटाळा प्रकरण; रणबीर कपूरने ईडीकडे मागितला 2 आठवड्याचा वाढीव वेळ - Mahadev App Scam

Ranbir Kapoor: बॉलिवुड अभिनेता रणबीर कपूरला बुधवारी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) समन्स (ED Action On Ranbir Kapoor) बजावल्यानंतर आता रणबीर कपूरने ईडीकडून दोन आठवड्यांचा वेळ मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ED Action On Ranbir Kapoor
रणबीर कपूरला ईडीचा समन्स

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 10:33 PM IST

मुंबई: Ranbir Kapoor: रणबीर कपूरला ईडीने बुधवारी समन्स (ED Action On Ranbir Kapoor) बजावून ६ ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले होते. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी (Mahadev App Scam ) रणबीर कपूरच्या ईडीने समन्स जारी केले होते. त्याला ६ ऑक्टोबरला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. त्याला रायपूर येथील ईडी कार्यालयासमोर हजर व्हावे लागणार आहे.

दोन आठवड्यांचा मागितला वेळ : सौरभ चंद्राकरशी यांच्या महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी रणबीरला समन्स बजावण्यात आले आहे. त्याला ईडीसमोर हजर राहून चौकशी केली जाणार आहे. पण आता हजर होण्याच्या तारखेच्या एक दिवस आधी रणबीरने ईडीकडे आणखी दोन आठवड्यांचा वेळ मागितल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर रणबीर हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

ईडीने चौकशीसाठी बोलावले : महादेव गेमिंग अ‍ॅप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑनलाइन जुगार अ‍ॅपवर मोठी कारवाई केली. याप्रकरणी ईडीने नुकतीच कोलकाता, भोपाळ आणि मुंबई येथे छापे टाकत ४१७ कोटी रुपये जप्त केली होती. आता महादेव गेमिंग अ‍ॅप प्रकरणी या अ‍ॅपची जाहिरातीत दिसणाऱ्या अभिनेत्याला ईडीने समन्स पाठवून चौकशीला बोलावले होते. मात्र, दोन आठवड्यांचा वेळ रणबीर कपूरने ईडीकडे मागितला असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.




अनेक दिग्गज ईडीच्या रडारवर : रणबीर कपूर महादेव अ‍ॅपचे प्रमोशन करत होता. ईडीने असा दावा केला आहे की, त्याला या प्रमोशनसाठी मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाली आहे. महादेव अ‍ॅपचे संस्थापक असे ४ ते ५ समान अ‍ॅप्स चालवत आहेत. हे अ‍ॅप्स युएई मधून चालवले जात असून या अ‍ॅप्सचे कॉल सेंटर श्रीलंका, नेपाळ आणि युएईमध्ये आहेत. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आहेत. अभिनेता टायगर श्रॉफ, गायिका नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यासह अनेक दिग्गज ईडीच्या रडारवर आहेत. भारती सिंग, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम यांचही नाव तपासात समोर आल्याने बॉलीवूड विश्वात खळबळ माजली आहे.




ऑनलाइन जुगार अ‍ॅपवर मोठी कारवाई: महादेव गेमिंग अ‍ॅप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑनलाइन जुगार अ‍ॅपवर मोठी कारवाई केली. याप्रकरणी ईडीने नुकतीच कोलकाता, भोपाळ आणि मुंबई येथे छापे टाकत ४१७ कोटी रुपये जप्त केली होती. आता महादेव गेमिंग अ‍ॅप प्रकरणी या अ‍ॅपची जाहिरातीत दिसणाऱ्या अभिनेत्याला ईडीने समन्स पाठवून चौकशीला बोलावले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. ED Action On Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरला ईडीने पाठवले समन्स, ६ ऑक्टोबरला हजर राहण्याचे निर्देश
  2. Ranbir Kapoor birthday : पाहा, रणबीर कपूरने घराबाहेर चाहत्यांसोबत कसा साजरा केला वाढदिवस
  3. Ramayana : रणबीर कपूर आणि सई पल्लवी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर दिसणार एकत्र...

ABOUT THE AUTHOR

...view details