महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेते राकेश रोशन यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना तुरुंगवास, सीबीआय न्यायालयाचा निर्णय

Bollywood actor Rakesh Roshan fraud case : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून अभिनेता दिग्दर्शक राकेश रोशन यांना 50 लाखाला गंडा घातल्या प्रकरणात दोघांना सीबीआय न्यायालयाने शिक्षा सुनावलीय.

Rakesh Roshan Fraud Case
अभिनेते राकेश रोशन

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 9:31 PM IST

मुंबई :Bollywood actor Rakesh Roshan fraud case : बॉलिवूड अभिनेता दिग्दर्शक राकेश रोशन यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून 50 लाखाला गंडा घातल्या प्रकरणात आरोपीला शिक्षा झालीय. सीबीआय न्यायालयाने मंगळवारी (९ जानेवारी) सुनावणी दरम्यान आरोपीला दोषी आढळल्यामुळे तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. अश्विनी कुमार, आणि राजेश राजन असं या आरोपींचं नाव आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.पी देसाई यांच्या न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.



खोटे सीबीआय अधिकारी भासवलं :2011 मध्ये राकेश रोशन यांच्या मुंबईतील घरी अश्विनी कुमार आणि राजेश राजन या दोन व्यक्तींनी घराचे दार ठोठावलं. आणि आम्ही सीबीआयकडून आलो आहोत अस सांगत राकेश रोशन यांची झडती घ्यायची आहे सांगितलं. तसंच, तुमच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे तुम्ही 50 लाख रुपये दिले तरच तुम्ही वाचू शकतालं अशी भीतीही दाखवली. या धमकीनंतर राकेश रोशन यांच्याकडून त्या दोघांनी पैसे उकळले. या प्रकारानंतर राकेश रोशन यांनी सीबीआय न्यायालयात खटला दाखल केला होता. त्या खटलामध्ये विशेष न्यायाधीश व्ही. पी देसाई यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्या सुनावणीमध्ये आरोपी अश्विनी कुमार शर्मा याला भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे दोषी ठरवलं. आरोपी अपंग असला तरी या प्रकरणा न्यायालयाने तीन वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

दोनशे व्यक्तींना आरोपींनी फसवलय: आरोपी अश्विनी कुमार याला एका अपघातामध्ये अपंगत्व आल्यामुळे त्याला न्यायालयात उपस्थित राहता येत नव्हते. म्हणून सीबीआय न्यायालयाने त्याला निकालाच्या दिवशी हजर राहण्याचं वॉरंट बजावलं होतं. त्यामुळे 9 जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने आरोपी अश्विनी कुमार खटल्यासाठी हजर होता. दरम्यान, सीबीआय न्यायालयाने या संदर्भात सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर 'आरोपीचा गंभीर गुन्हा आहे. तसेच, एक नव्हे तर अशा दोनशे व्यक्तींना आरोपींनी फसवलय. त्यामुळे अश्विनी कुमार याला तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येत आहे अस न्यायमुर्ती व्ही. पी. देसाई यांनी निर्णय दिला.

हेही वाचा :

ABOUT THE AUTHOR

...view details